शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच भाषण देणाऱ्या सदस्यांना फक्त १५ मिनिटे; 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 17:48 IST

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 बैठका घेणार असून ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे.

दिल्लीत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तयारी सुरु झाली आहे. राज्यसभेच्या सभापतींनी पहिल्यांदाच भाषण देणाऱ्या सदस्यांना १५ मिनिटांचाच वेळ दिला आहे. सभागृहातील वेळेचे नियोजन प्रभावित होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. महासचिव पी सी मोदी यांनी लोकसभेच्या सभापतींच्या निर्देशाचा उल्लेख केला आहे. 

संसदीय पद्धतीनुसार, सभागृहात पहिले भाषण करणाऱ्या सदस्यांना बोलताना अडथळा आणत नाहीत. नवीन सदस्यांच्या भाषणासाठीही अध्यक्षांकडून योग्य वेळ दिला जातो. काहीवेळा सभासद आपले पहिले भाषण करणार्‍याला नेहमीपेक्षा वेळ घेतात असे दिसून आले आहे. यामुळे पुढचे काम प्रभावित होते. काहीवेळा ते चर्चेच्या विषयापासून दूर जातात, यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मोदी म्हणाले. 

पहिले भाषण करणार्‍या सदस्याने आपले भाषण अशा रीतीने केले पाहिजे की त्याचा दिवसाच्या नियोजित कामकाजाच्या वेळेच्या व्यवस्थापनावर परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले. तसेच यासाठी 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेऊ नये. कोणत्याही सदस्याने त्यांनी नोटीस दिलेली आणि जी सभापतींकडे प्रलंबित आहे, अशी बाब सभागृहात मांडू नये, असेही सूचित करण्यात आले आहे. 

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होणार आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 बैठका घेणार असून ते 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारीपासून १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार असून 6 एप्रिलपर्यंत चालणार आहे.  

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनRajya Sabhaराज्यसभाlok sabhaलोकसभा