शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जुलैमध्ये ६७,००० मेट्रिक टन कांदा निर्यात घटली; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील पकड सैल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 09:27 IST

कांद्याबाबत सरकारची धरसोड भूमिका, निर्यातीवर लादलेले ४० टक्के किमान निर्यात मूल्य ही आहेत कारणे

लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: कांद्याबाबत सरकारची धरसोड भूमिका, निर्यातीवर लादलेले ४० टक्के किमान निर्यात मूल्य आदी कारणांनी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरातून समुद्रमार्गे कांद्याची निर्यात ६० टक्क्यांनी घटली आहे. मागील वर्षी जुलै महिन्यात या बंदरातून ८९,१७४.७६० मेट्रिक टन कांदा विविध देशांमध्ये भारतातून रवाना झाला होता. या वर्षाच्या जुलै महिन्यात केवळ २१,७६५.३२२ मेट्रिक टन कांदा समुद्रमार्गे विदेशात पोहोचला आहे. या एकाच महिन्यात तब्बल ६७,४०९.४०० मे. टन कांद्याची घट दिसून आली. ऑगस्ट महिन्यातही वेगळी स्थिती नाही.

देशाची कांदा निर्यात गतवर्षात १३ टक्क्यांनी घटली असल्याचे आकडे जून महिन्यात समोर आले होते. त्यानंतरही निर्यातीचा आलेख सातत्याने घसरत असल्याची बाब प्रकर्षाने जाणवते. वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये कांदा निर्यातीतून ३,८७४ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले होते. विदेशात जाणारे कांद्याचे कंटेनर घटल्याने बंदराच्या उत्पन्नातही घट झाली आहे. 

बांगलादेशकडील निर्यात सुरळीत

- गेल्या चार ते पाच दिवसांपासून बांगलादेशला ट्रकद्वारे कांदा निर्यात सुरळीत सुरू झाली असल्याची माहिती प्रमुख निर्यातदारांनी दिली. - बांगलादेशला राजकीय अराजकता माजल्यावर  सीमा सील असल्याने दाेघा देशांच्या सीमेवर कांद्याचे ट्रक अडकून पडले होते.- ३६ तासांनंतर वाहतूक सुरळीत झाली अन् दोन दिवसांनी पुन्हा काही काळ ट्रक थांबले होते.- मात्र, आता चार-पाच दिवसांपासून भारतातून दररोज ८० ट्रक कांदा भरून बांगलादेशला पोहोचत आहे.- हा एक दिलासा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला आहे. दुसरीकडे समुद्रीमार्गे निर्यात मात्र घटली आहे.

टॅग्स :onionकांदा