शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलमधल्या नैसर्गिक वायुसाठ्यांवर ओएनजीसी बोली लावण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 20:37 IST

इस्रायलमधील नैसर्गिक वायूंच्या साठ्यांवर भारतातल्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) बोली लावण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली

जेरुसलेम, दि. 4 - इस्रायलमधील नैसर्गिक वायूंच्या साठ्यांवर भारतातल्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) बोली लावण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायल दौऱ्यानंतर हा सर्वात मोठा करार ठरण्याची शक्यता आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे स्पष्ट केलं आहे.अनेकदा इस्रायलमधील नैसर्गिक वायुसाठ्यांच्या बोलीकडे आंतरराष्ट्रीय तेल कंपन्या पाठ फिरवत असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. नैसर्गिक वायू आणि तेल क्षेत्रांत अरब राष्ट्रांचं वर्चस्व आहे. अरब राष्ट्रांना नाराज न करण्याच्या उद्देशानं ब-याच आंतरराष्ट्रीय तेल कंपन्यांनी इस्रायलसोबत करार करण्याचं टाळलं आहे. परंतु भारताचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विधानानंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्याला अनपेक्षितरीत्या महत्त्वही प्राप्त झालं आहे. इस्रायलच्या समुद्राच्या तळाशी असलेल्या नैसर्गिक वायूसाठ्यांसाठी ओएनजीसी बोली लावणार आहे, असे विधान त्यांनी केले होते.भारताच्या शिष्टमंडळाने इस्रायलमधील नैसर्गिक वायुसाठ्यांची पाहणी केली असून, लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचा मानसही बोलून दाखवला आहे. इस्रायलच्या भूमध्य समुद्रात मोठ्या प्रमाणात है नैसर्गिक वायूंचे अनेक साठे आहेत. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी भारताच्या पेट्रोलियम मंत्रालयानं पाठवलेल्या शिष्टमंडळाने इस्रायलमधील अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चासुद्धा केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलैमध्ये इस्रायलचा दौरा केल्यानंतर इस्रायलनंही भारताच्या विकासासाठी हातभार लावण्याचे सूतोवाच केले होते. संरक्षण क्षेत्रात इस्रायल आणि भारत या दोन्ही देशांची द्विपक्षीय संबंध फार चांगले आहेत. त्यामुळेच तंत्रज्ञान, तेल, ऊर्जा आदी क्षेत्रांतील व्यापारी संबंध सुधारण्यासाठीसुद्धा दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. ओएनजीसीला इस्रायलमधील नैसर्गिक वायुसाठा मिळाल्यास दोन्ही देशांमध्ये हा महत्त्वपूर्ण करार ठरू शकतो. तसेच भारतालाही याचा मोठा फायदा मिळणार आहे. इस्रायल या देशासोबतच लेबनन येथील नैसर्गिक वायूसाठे मिळवण्याचा भारत प्रयत्न करत असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.