शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अनंतनाग येथील चकमकीत लष्कराकडून एका दहशतवाद्याचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 10:52 IST

काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील मोहीम लष्कराने पुन्हा एकदा तीव्र केली आहे.

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या दहशतवाद्यांविरोधातील मोहीम लष्कराने पुन्हा एकदा तीव्र केली आहे. आज सकाळी अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम शाहबाग लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीला सुरुवात झाली असून, या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. दरम्यान, या परिसरात लष्कराने दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असून, चकमक अद्याप सुरू आहे. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचा मृतदेह अद्याप ताब्यात आलेला नाही. मात्र मृत दहशतवाद्याचे नाव मोहम्मद इक्बाल असल्याचे समोर आले आहे. तो जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. सध्या दोन्ही बाजूनी गोळीबार सुरू असून, दहशतवादी लपून बसल्याची शक्यता गृहित धरून सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनी परिसराला घेराव घातला आहे. 

 दरम्यान, पुलवामा जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी पहाटे सुरू झालेल्या चकमकीत  चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. त्यानंतर या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुरक्षा दलांनी 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी