शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

१२ राज्यांच्या विरोधानंतर केंद्र सरकारचे एक पाऊल मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 06:14 IST

आयएएस अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्त्या धोरणाला १२ राज्यांचा विरोध

हरीश गुप्तानवी दिल्ली : भारतीय प्रशासन सेवेच्या प्रतिनियुक्ती बाबतच्या नियमांत दुरुस्ती करण्याची घाई केंद्र सरकारला कदाचित करता येणार नाही कारण त्या नियोजित प्रस्तावाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (रालोओ) सरकार नसलेल्या महाराष्ट्रासह १२ राज्यांनी विरोध केलेला आहे. आयएएस अधिकाऱ्यांनी राज्यांतून केंद्रात नियुक्तीवर येण्यास भाग पाडणाऱ्या केंद्र सरकारच्या मनमानी धोरणाला ९ राज्यांनी पूर्णपणे विरोध केला आहे. ३ राज्यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर आपला दृष्टिकोन बदलून घेण्याची तयारी दाखवली आहे. कर्नाटक, मेघालय आणि बिहारने आधी विरोध केला होता. नंतर त्याचा फेरविचार करण्यास संमती दिली.

नियमाची अंमलबजावणी करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला होता परंतु ९ प्रमुख राज्यांच्या रांगेत ओडिशा सरकार उभे राहिल्यावर सरकारला आपले पाऊल मागे घ्यावे लागले. केंद्र सरकारचे हे नवे धोरण घटनेच्या संघ रचनेचे उल्लंघन असल्याचे या राज्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या या धोरणाला विरोध करून २५ जानेवारीच्या आधी औपचारिक पत्रही पाठवले जाणार होते. 

१२ जानेवारीच्या पत्राने निर्माण झाला वादn    पश्चिम बंगाल, छत्तीसगड, राजस्थान, केरळ, तमिळनाडू, झारखंड अशा राज्यांच्या यादीत तेलंगण ही उभे राहिल्यावर केंद्र सरकारला आश्चर्य वाटले. ओडिशा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशने केंद्र सरकारला औपचारिक पत्र लिहून आपला दृष्टिकोन कळविला आहे. n    कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने राज्यांना १२ जानेवारी रोजी पाठवलेल्या पत्राने वाद निर्माण झाला आहे. आयएएस (केडर) रूल्स, १९५४ मध्ये दुरुस्तीचा  विचार असल्याचे त्यात म्हटले होते.

टॅग्स :GovernmentसरकारState Governmentराज्य सरकार