शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

एक खोली, 84 बँक अकाउंट अन् 854 कोटींची फसवणूक; पैशांचा ढिग पाहून पोलिसही चक्रावले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 15:53 IST

पोलिसांनी बंगळुरुतील दोन उच्चशिक्षित तरुणांना 854 कोटी रुपयांच्या सायबर गुन्ह्यात अटक केली आहे.

Cyber Crime: कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधून सायबर गुन्ह्याचे मोठे प्रकरण समोर आले आहे. या गुन्ह्यात दोन तरुणांचा सहभाग आहे, यातील एक एमबीए तर दुसरा इंजिनीअर आहे. या दोघांनी एका खोलीत बसून सायबर फसवणुकीचे असे जाळे विणले, जे जाणून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. बंगळुरतील येलहंका भागातील एका घरावर आयकर विभागाने छापा टाकला आणि पलंगाखाली लपवलेले 854 कोटी रुपये जप्त केले.

मनोज श्रीनिवास(MBA, 33 वर्षे) आणि फणींद्र(सॉफ्टवेअर इंजिनिअर, 36 वर्षे), या सायबर फसवणुकीतील दोन तरुणांची नावे आहेत. या दोघांनी बिना नावाची एक कंपनी उघडली आणि कंपनीत दोन तरुणांना कामावर ठेवले. त्यांना 8 मोबाईल फोन रात्रंदिवस सुरू ठेवण्याचे काम दिले होते. सप्टेंबरमध्ये बंगळुरू सायबर क्राईम पोलिसांनी मनोज आणि फणींद्र यांच्यासह 6 जणांना अटक केली.

तरुणीने फसवणुकीची तक्रार दाखल केली एका 26 वर्षीय तरुणीने पोलिसांत साडेआठ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. कमी गुंतवणुकीच्या बदल्यात जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष तिला दाखवण्यात आले होते. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिस तपासादरम्यान हे फसवणुकीचे जाळे भाड्याच्या घरातून चालवले जात असल्याचे समोर आले. श्रीनिवास आणि फणींद्र, सोशल मीडियाद्वारे लोकांची फसवणूक करायचे. चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून हे दोघेही लोकांना फसवत असे. या दोघांनी आतापर्यंत हजारो लोकांना आपले बळी बनवले होते.

2 वर्षांत 854 कोटी रुपयांचे व्यवहार बंगळुरूमधील सायबर क्राईम पोलिसांनी त्यांच्या नेटवर्कचा तपास केला तेव्हा त्यांना कळले की, गेल्या दोन वर्षांत या लोकांनी 84 बँक खात्यांद्वारे 854 कोटी रुपयांचे व्यवहार केला आहे. सप्टेंबरमध्ये पोलिसांनी बँक खाती शोधून गोठवली. यादरम्यान बँक खात्यात फक्त 5 कोटी रुपये शिल्लक होते, तर 854 कोटी रुपये गेमिंग अॅप्स, USDT सारख्या क्रिप्टोकरन्सी, ऑनलाइन कॅसिनोसह अनेक ठिकाणी ट्रांसफर केले गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकीचे मुख्य नेटवर्क दुबईतून कार्यरत होते. याप्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbangalore-central-pcबंगलोर सेंट्रलPoliceपोलिसfraudधोकेबाजी