शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
5
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
6
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
7
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
9
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
10
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
11
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
12
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
13
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
14
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
15
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
16
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
17
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
18
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
19
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
20
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर दुसरे काशीमध्ये : नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 05:50 IST

वाराणसीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट स्टेडियमचे केले भूमिपूजन

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांचा मतदारसंघ वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचे भूमिपूजन केले. ते म्हणाले की, ‘देशात असे वातावरण झाले आहे की, जो खेळेल तो फुलेल.’ ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भोजपुरीमध्ये पंतप्रधानांनी भाषणाची सुरुवात केली आणि ते म्हणाले की, ‘आज पुन्हा वाराणसीमध्ये येण्याची संधी मिळाली.

वाराणसीमध्ये मला जो आनंद मिळाला तो शब्दात सांगणे अशक्य आहे. आज मी अशा दिवशी काशीला आलो आहे, जेव्हा भारत चंद्राच्या शिवशक्ती बिंदूवर पोहोचून एक महिना पूर्ण होत आहे. शिवशक्ती म्हणजे असे स्थान जिथे गत महिन्यात २३ रोजी चंद्रयान उतरले होते. शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर आणि दुसरे शिवशक्तीचे स्थान माझ्या काशीत आहे.’ यावेळी जमलेल्या जनसमुदायाला वारंवार माझे कुटुंबीय म्हणून संबोधित करताना ते म्हणाले की, ‘ज्या ठिकाणी आपण सर्व एकत्र आलो ते पवित्र स्थानासारखे आहे. हे ठिकाण माता विंध्य धाम आणि काशी शहराला जोडणाऱ्या मार्गावरील ठिकाण आहे. येथून काही अंतरावर समाजवादी नेते राजनारायण यांचे गाव आहे.’ (वृत्तसंस्था) 

उज्ज्वल भविष्याबद्दल आत्मविश्वास वाढतो...

n काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील शहडोल येथे आदिवासी गावाला दिलेल्या भेटीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मला तेथील काही तरुणांना भेटण्याची संधी मिळाली. मला खूप आश्चर्य वाटले. तरुण म्हणाले की, हे माझे मिनी ब्राझील आहे. ते म्हणाले की, प्रत्येक घरात फुटबॉलपटू आहेत. n हे पाहून देशाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल माझा आत्मविश्वास वाढतो. नऊ वर्षांपूर्वीच्या तुलनेत क्रीडा बजेट तीनपट वाढले आहे. ‘खेलो इंडिया’ कार्यक्रमाचे बजेट गेल्यावर्षी ७० टक्क्यांनी वाढले आहे.’

४५० कोटी रुपये खर्च 

येथील रजतलाब परिसरातील रिंगरोडजवळ सुमारे ४५० कोटी रुपये खर्चून बांधले जाणारे आणि ३० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रफळावर पसरलेले हे स्टेडियम डिसेंबर २०२५ पर्यंत तयार होण्याची शक्यता आहे. कानपूर आणि लखनौनंतर उत्तर प्रदेशातील हे तिसरे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असेल. 

आज काशीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी झाली आहे. हे केवळ वाराणसीसाठी नव्हे, तर पूर्वांचलच्या तरुणांसाठी वरदान ठरेल. हे स्टेडियम तयार झाल्यावर ३० हजारांहून अधिक लोक एकाच वेळी बसून सामना पाहू शकतील. आज जग क्रिकेटच्या माध्यमातून भारताशी जोडले जात आहे. विविध देश क्रिकेट खेळण्यासाठी भारतात येत आहेत.     नरेंद्र मोदी, पंतप्रधान  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतSachin Tendulkarसचिन तेंडुलकर