शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळावर जाण्यासाठी तब्बल 1 लाख भारतीयांनी केलं बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 10:16 IST

मंगळावर जाण्यासाठी तब्बल 1 लाख 38 हजार 899 भारतीयांनी बुकिंग केलं आहे.

ठळक मुद्देमंगळावर जाण्यासाठी तब्बल 1 लाख 38 हजार 899 भारतीयांनी बुकिंग केलं आहे. 2018 मध्ये मंगळावर जाण्याचं नासाचं मिशन सुरू होणार असून त्यासाठी तिकीटांचं बुकिंग सुरू झालं आहे.

मुंबई- मंगळावर जाण्यासाठी तब्बल 1 लाख 38 हजार 899 भारतीयांनी बुकिंग केलं आहे. 2018 मध्ये मंगळावर जाण्याचं नासाचं मिशन सुरू होणार असून त्यासाठी तिकीटांचं बुकिंग सुरू झालं आहे. नासाने तिकीट बुकिंग सुरू करताच जगभरातून या तिकीट खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. यात तब्बल 1 लाख 38 हजार 899 भारतीयांनी मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक केलं आहे. मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

नासाने Insight मिशन अंतर्गत मंगळावर जाण्याची मोहीम आखली आहे. ज्या लोकांनी मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक केलं आहे, त्यांना नासाकडून ऑनलाइन बोर्डिंग पास देण्यात येणार आहे. मंगळावर जाणाऱ्यांची नावं एका सिलिकॉन चिपवर इलेक्ट्रॉनिक्स बीमच्या मदतीने कोरण्यात येणार आहेत. चिपवर कोरलेली ही अक्षरं केसांच्या हजाराव्या भागाहून पातळ असतील, असं सुत्रांनी सांगितलं.

मंगळावर जाण्यासाठी तिकीट बुक करणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आहे. या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. अमेरिकेतून 6 लाख 76 हजार 773 लोकांनी मंगळ मिशनसाठी तिकीट बुकिंग केलं आहे. तर दुसऱ्या स्थानावर चीन असून चीनमधून 2 लाख 62 हजार 752 लोकांनी मंगळावर जाण्यासाठी बुकिंग केल आहे. दरम्यान, मंगळ मोहीम हे नासाचं मिशन असल्यानं अमेरिकेतून त्याला सर्वाधिक प्रतिसाद मिळणं अपेक्षितच होतं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तर भारत आणि अमेरिकेमधील अंतराळ तंत्रज्ञानातील परस्पर संबंधामुळे भारतीयांनीही मंगळावर जाण्यासाठी सर्वाधिक उत्सूकता दाखविल्यांच तज्ज्ञांनी सांगितलं.

मंगळयान मोहीमेसाठी नाव नोंदणी गेल्या आठवड्यात बंद झाली. त्यामुळे आता नवीन नोंदणी होणार नाही. हे मिशन 2018 ला सुरू होणार असून 26 नोव्हेंबर 2018 रोजी सर्वजण मंगळावर पोहचतील. एकूण 720 दिवसाचं हे मिशन आहे. यावेळी मंगळावर होणाऱ्या भूकंपाचा अभ्यास करण्यात येणार असल्याचं नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी (जेपीएल)ने सांगितलं.