दुचाकी अपघातात एक ठार
By admin | Updated: August 11, 2015 22:11 IST
नाशिक : गंगापूर रोडवरील अभिनव बालविकास मंदिर शाळेसमोरील दुभाजकावर रविवारी रात्री दुचाकी आदळून झालेल्या अपघातात गोविंदनगर येथील धीरज रामपाल शर्मा (२५) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़
दुचाकी अपघातात एक ठार
नाशिक : गंगापूर रोडवरील अभिनव बालविकास मंदिर शाळेसमोरील दुभाजकावर रविवारी रात्री दुचाकी आदळून झालेल्या अपघातात गोविंदनगर येथील धीरज रामपाल शर्मा (२५) या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ दिंडोरी रोडवरील गायत्रीनगरमधील रहिवासी सागर रत्नाकर बोरसे व धीरज शर्मा हे दोघे रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरून दुचाकीने (एमएच १५, सीआर ८५३८) जात होते़ भरधाव असलेली ही दुचाकी दुभाजकावर आदळून अपघात झाला़ यामध्ये गंभीर झालेल्या शर्मा यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी विकी मनचंदन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसांनी दुचाकीचालक सागर रत्नाकर बोरसेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़(प्रतिनिधी)