शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा गांधींनी साधे राहणीमान स्वीकारल्याच्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण; हुतात्मा कनकलता यांना देशाचे अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 06:54 IST

दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी सुटाबुटात वावरत असत; पण भारतात आल्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य पोशाखाला दूर केले व पारंपरिक गुजराती पोशाखात ते वावरू लागले. 

 

नवी दिल्ली :भारतातील गरीब लोक जसा वेश परिधान करतात तसेच आपणही राहायचे असे ठरवून महात्मा गांधी यांनी २२ सप्टेंबर १९२१ रोजी आपल्या गुजराती वेशभूषेचा त्याग केला व ते पंचा नेसू लागले. या ऐतिहासिक घटनेला बुधवारी शंभर वर्षे पूर्ण झाली. आसाममधील स्वातंत्र्यसेनानी कनकलता बरूआ या एका पोलीस ठाण्यावर २० सप्टेंबर १९४२ रोजी ध्वज फडकविण्याच्या प्रयत्नात असताना, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाल्या. त्या घटनेला ७९ वर्षे पूर्ण झाली. देशाला स्वातंत्र्यप्राप्ती झाली, त्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात, या ऐतिहासिक घटनांचे देशभरात स्मरण केले जात आहे. दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतल्यानंतर गांधीजींनी देशभर दौरा करून जनतेच्या स्थितीची पाहणी केली होती. दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधी सुटाबुटात वावरत असत; पण भारतात आल्यानंतर त्यांनी पाश्चिमात्य पोशाखाला दूर केले व पारंपरिक गुजराती पोशाखात ते वावरू लागले. 

- देशातील गरीब जनता किती हालअपेष्टांमध्ये जगते आहे हे खूप जवळून पाहिल्यानंतर गांधीजींनी अत्यंत साधे राहणीमान स्वीकारले. त्यांनी गुजराती पोशाखाचाही त्याग केला. निव्वळ पंचा नेसून यापुढे राहायचे असा निर्धार त्यांनी केला. - या अतिशय साध्या वेशात ते पहिल्यांदा मदुराई येथे   २२ सप्टेंबर १९२१     रोजी वावरले. तिथे त्यांनी भाषणही केले. - ती जागा गांधीजी पोट्टल म्हणून प्रसिद्ध आहे. या घटनेला यंदा शंभर वर्षे पूर्ण झाली. 

महत्त्वाच्या घटनांना उजाळास्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात आसाममध्ये एका पोलीस ठाण्यावर तिरंगा फडकविण्याच्या प्रयत्नात असताना कनकलता बरुआ या अवघ्या १७ वर्षे वयाच्या स्वातंत्र्यसेनानी २० सप्टेंबर १९४२ रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात शहीद झाल्या. त्या घटनेला यंदा ७९ वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्यप्राप्तीच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या घटनांना उजाळा दिला जात आहे. त्यानुसार महात्मा गांधी व कनकलता बरुआ यांच्याशी संबंधित घटनांचे स्मरण करून त्यांना देशभरात अभिवादन करण्यात आले.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत