शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
2
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
3
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
5
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
6
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
7
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
8
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
9
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
11
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
12
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
13
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
14
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
15
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
16
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
17
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
18
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
19
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
20
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा

एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:56 IST

पंचायत निवडणुकीच्या आधीच असा एक प्रकार उघडकीस आला, ज्याने खुद्द निवडणूक आयोगाचे अधिकारीही चक्रावून गेले.

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीत गैरव्यवहार झाल्याच्या बातम्या येत असतात. यावेळी महोबा जिल्ह्यातूनही असेच काहीसे प्रकरण समोर आले आहे. पंचायत निवडणुकीच्या आधीच असा एक प्रकार उघडकीस आला, ज्याने खुद्द निवडणूक आयोगाचे अधिकारीही चक्रावून गेले. येथे एकाच घरात तब्बल ४,२७१ मतदारांची नोंदणी आढळली आहे. विशेष म्हणजे या गावात एकूण मतदारांची संख्या केवळ १६,००० आहे. हा ४,२७१ मतदारांचा घोटाळा राज्य निवडणूक आयोगाने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने केलेल्या सर्वेक्षणात उघड झाला आहे.

हे प्रकरण महोबा येथील जैतपुर गावातील आहे. एआयने या गावात एक असा मतदार गट शोधून काढला आहे, ज्यामध्ये एकूण ४,२७१ मतदार आहेत. या सर्व मतदारांचा पत्ता एका तीन खोल्यांचे घर असल्याचे सांगितले आहे. याची सत्यता पडताळण्यासाठी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी बीएलओला घटनास्थळी पाठवले. जेव्हा घरमालकाला याबद्दल माहिती माहिती विचारण्यात आली, तेव्हा ते स्वतःच चकित झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात मतदारांची नोंद त्यांच्या पत्त्यावर कशी झाली आणि हे कोण लोक आहेत, हे त्यांना स्वतःलाही माहीत नव्हते.

यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे सर्व बोगस मतदार ज्या उमेदवाराला मतदान करतील, त्याचा विजय निश्चित आहे. एवढेच नाही, तर याच मतांच्या जोरावर गावात दोन ग्रामपंचायत सदस्य आणि एक ब्लॉक पंचायत सदस्यसुद्धा निवडले जाऊ शकतात. मात्र, आता निवडणूक आयोगाने घरातील खऱ्या मतदारांची ओळख पटवून इतर सर्व मतदारांना बोगस ठरवले असून, त्यांना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याआधीही महोबा येथे एका पानपट्टीवाल्याच्या पत्त्यावर २४३ बोगस मतदार आढळले होते.

पंचायत निवडणुकीपूर्वी सर्वेक्षण सुरू!उत्तर प्रदेश राज्य निवडणूक आयोगाने त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीसाठी मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम २० सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. या अंतर्गत, आयोग एआयच्या मदतीने बोगस मतदारांची ओळख पटवत आहे. एआयने ओळखलेल्या बोगस मतदारांची संबंधित भागातील बीएलओमार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. याच प्रक्रियेत महोबाच्या जैतपुर गावातील घर क्रमांक ८०३ मध्ये ४,२७१ मतदारांची नावे आढळून आली. महोबाचे एडीएम कुंवर पंकज यांच्या मते, मतदार यादीतील त्रुटी सुधारल्या जात आहेत.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशElectionनिवडणूक 2024