शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्येच्या संशयावरून मारहाणीत एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 06:53 IST

झारखंडमधील घटना; दोन जण गंभीर जखमी

खुंटी : गोहत्या केल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या जबर मारहाणीत एका दिव्यांग इसमाचा बळी गेला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. झारखंडमधील खुंटी जिल्ह्यामध्ये रविवारी हा प्रकार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.जलतंगा गावी नदीच्या किनारी कलंतूस बार्ला, फागू कच्छप, फिलीप होरो या तिघांना गायीच्या मृतदेहासह गावकऱ्यांनी पाहिले. त्यामुळे संतापलेल्या जमावाने केलेल्या जबर मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यातील कलंतूस बार्ला याला रुग्णालयात नेले जात असताना तो वाटेतच मरण पावला. फागू, फिलीप या दोन जखमींना रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या पाच जणांंना सोडून द्यावे, अशी मागणी करीत गावकऱ्यांनी कर्रा पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. गुन्ह्यात कोणताही सहभाग न आढळल्यास या पाच जणांना सोडण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकारी ऋषभ झा यांनी संतप्त गावकºयांना दिल्यानंतर हा घेराव मागे घेण्यात आला.या मारहाणीत पाच जणांचा सहभाग असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक वेणुकांत होमकार यांनी सांगितल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. ही घटना घडली त्या ठिकाणी तपासणी केली असता पोलिसांना गायीचा मृतदेह आढळून आला नाही. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. (वृत्तसंस्था)हिंसाचार रोखण्यात सरकार अपयशीदेशामध्ये गोहत्या केल्याच्या संशयावरून जमावाने जबर मारहाणीद्वारे एखाद्या व्यक्तीचा बळी घेण्याचे प्रकार वाढीला लागले आहेत.मोदी सरकारच्या काळात अशा प्रकारांना बळ मिळत असल्याचा आरोप काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांनी याआधी केला होता.झारखंडमध्ये जादूटोणा केल्याच्या, तसेच गोहत्येच्या संशयावरून एखाद्याला मारहाणीद्वारे ठार मारण्याचे प्रकार घडत असतात. त्यांना आळा घालण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याचीही टीका होत आहे.

टॅग्स :Lynchingलीचिंग