शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात आठ वर्षीय बालकाचा भूूकबळी, कुटुंबाची उपासमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 05:00 IST

भुकेने व्याकूळ झालेल्या आठ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यात सोमवारी घडली.

बडवानी : भुकेने व्याकूळ झालेल्या आठ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा तालुक्यात सोमवारी घडली. गेल्या काही दिवसांपासून अन्नाचा कणही पोटात न गेल्याने या दुर्दैवी बालकाच्या कुटुंबातील अन्य पाच जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कृषिप्रधान भारतात अन्नावाचून बालकांचा मृत्यू व्हावा, ही बाब लाजिरवाणी आहे.रतन कुमारच्या कुटुंबियांच्या हालअपेष्टा आणि व्यथा हृदयाला पाझर फोडणारी आहे. या अभागी कुटुंबियांच्या नातेवाईकांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून रतन कुमारच्या कुटुंबियांनी काहीही खाल्लेले नाही. या कुटुंबाकडे शिधापत्रिका (रेशन कार्ड) नसल्याने त्यांना दरमहा स्वस्तदर धान्य दुकानातून स्वस्तातील धान्यही घेता येत नाही. काही गावकरीच आपापल्यापरीने त्यांची भूक भागवून त्यांना मदत करतात.रोजंदारीवर काम करणाऱ्या या कुटुंबाला सरकारच्या कोणत्याही कल्याणकारी योजनेचा लाभ मिळत नाही, असे एका नातेवाईकाने सांगितले. पोटात अन्नाचा कण नसल्याचे उलट्या आणि अतिसार होत असल्याने रतन कुमारच्या कुटुंबियांतील पाच जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. आम्ही गेल्या काही दिवसांपासून काहीही खाल्लेले नाही, असे या कुटुंबियांनी सांगितल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. सुनील पटेल यांनी दिली.त्यांच्या अवस्था बघता गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अन्नच ग्रहण केले नसल्याचे प्रथम सकृत्दर्शनी दिसते, असे उपविभागीय दंडाधिकारी अंशू ज्वाला म्हणाल्या. याप्रकरणी अधिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कुटुंबियांना सरकारच्या कल्याणकारी योजनांचे लाभ मिळवून दिले जातील. त्यांना लाभांपासून वंचित ठेवणाºया दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी हमीही त्यांनी दिली. 

टॅग्स :Deathमृत्यूMadhya Pradeshमध्य प्रदेश