शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
5
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
6
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
7
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
8
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
9
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
10
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
11
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
12
पुण्यात सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप, धंगेकरांचा आरोप 
13
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
14
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
15
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
16
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
17
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
18
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
19
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 
20
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले

एक काेटी नाेकऱ्या अन् माेफत वीज; ‘राजद’चे परिवर्तन पत्र जाहीर, अनेक आश्वासने काॅंग्रेसच्या न्यायपत्रातील 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 7:46 AM

तेजस्वी यादव यांनी शनिवारी लाेकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

पाटणा: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांनी शनिवारी लाेकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात देशभरातील एक कोटी बेरोजगार तरुणांना सरकारी नोकऱ्या आणि राखीपौर्णिमेच्या दिवशी गरीब कुटुंबातील भगिनींना दरवर्षी एक लाख रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यास ही आश्वासने पूर्ण करण्यात येतील, असे ते म्हणाले. ‘राजद’ने आपल्या जाहीरनाम्याला ‘परिवर्तन पत्र’ असे नाव दिले आहे. त्यात जनतेला एकूण २४ आश्वासने देण्यात आली आहेत. 

‘आज जी काही आश्वासने दिली, ती निश्चितपणे पूर्ण केली जातील. २०२०च्या बिहार विधानसभा निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने आम्ही आमच्या कार्यकाळात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही ५ लाख सरकारी नोकऱ्यांची व्यवस्था केली; तसेच जातिनिहाय जनगणनेसह आरक्षण मर्यादा ७५ टक्के केली, असे ते म्हणाले.  

दिली काेणकाेणती आश्वासने?

  1. देशभरातील एक कोटी बेरोजगार तरुणांना सरकारी नोकऱ्या.
  2. राखी पौर्णिमेपासून गरीब कुटुंबातील महिलांना वार्षिक १ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य.
  3. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करू. 
  4. एलपीजी सिलिंडर ५०० रुपयांना देऊ.
  5. बिहारला विशेष दर्जासह सर्वांगीण विकासासाठी पुढील पाच वर्षांत १ लाख ६० हजार कोटी रुपयांचे पॅकेज देणार.
  6. बिहारच्या धर्तीवर देशभरात जात जनगणनेसह आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करणार.
  7. कर्तव्य बजावताना धारातीर्थी पडलेल्या निमलष्करातील जवानाला हुतात्मा दर्जा.
  8. ज्येष्ठांसह इतरांना पूर्वी असलेली रेल्वे भाड्यातील सवलत पुन्हा सुरू करणार.
टॅग्स :BiharबिहारTejashwi Yadavतेजस्वी यादवRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दल