शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या दोन भेटवस्तूंसाठी प्रत्येकी कोटीची बोली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 03:37 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या सुरू असलेल्या लिलावात दोन भेटवस्तू प्रत्येकी एक कोटी रुपयांना विकल्या गेल्या आहेत.

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या सुरू असलेल्या लिलावात दोन भेटवस्तू प्रत्येकी एक कोटी रुपयांना विकल्या गेल्या आहेत. यापैकी एक गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दिलेला चांदीचा कलश आहे, तर दुसरा गुजरातमधील मोदी समाज मंडळाने दिलेला फोटो स्टॅण्ड आहे.चांदीच्या कलशासाठी १,८०० रुपये राखीव किंमत ठेवण्यात आली होती. फोटो स्टॅण्डची राखीव किंमत ५०० रुपये ठेवण्यात आली होती. मात्र दोन्ही भेटवस्तूंना प्रत्येकी एक कोटी रुपयांची सर्वाधिक बोली आली व त्या किमतीला या वस्तू विकल्या गेल्या. मात्र या वस्तू कोणी खरेदी केल्या हे जाहीर करण्यात आले नाही. लिलावात चढ्या बोलीने विकली गेलेली एक भेटवस्तू सवत्स धेनूची पंचधातूची मूर्ती आहे. ही १,५०० रुपये राखीव किंमत असलेली वस्तू ५१ लाख रुपायांना विकली गेली होती.मोदी यांना गेल्या सहा महिन्यांत देशाच्या दौऱ्यांमध्ये मिळालेल्या २,७७२ भेटवस्तूंचा ई-लिलाव १४ सप्टेंबरपासून सुरू झाला असून तो ३ आॅक्टोबरपर्यंत चालेल. या वस्तू येथील राष्ट्रीय आधुनिक कला दालनात (एनजीएमए) प्रदर्शनातही मांडण्यात आल्या आहेत. ‘एनजीएमए’तर्फे हा लिलाव होत असून ‘नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर’ने खास पोर्टल विकसित केले आहे.या भेटवस्तूंमध्ये अनेक कलाकारांनी काढलेली एक हजाराहून अधिक पोर्टेट आहेत. इतर वस्तूंमध्ये विविध प्रकारचे खंजीर, कुकरी व सुरा यासारखी शस्त्रे, विविध राज्यांत प्रचलित असलेल्या पगड्या, अनेक शाली इत्यादींचा समावेश आहे. या सर्व वस्तूंसाठी २०० रुपयांपासून २.५ लाख रुपयांपर्यंत राखीव किंमती ठेवल्या आहेत. सर्वाधिक राखीव किंमत अस्ल रेशमी कापडावर काढलेल्या मोदींच्या पोर्टेटची आहे. पिछवाई शैलीतील आणखी एका पोर्टेटची किंमत दोन लाख रुपये आहे.>रक्कम शिक्षणासाठीमोदींना सरकारी दौऱ्यांमध्ये मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव गेल्या वर्षीही करण्यात आला होता. मात्र त्यातून एकूण किती रक्कम मिळाली हे जाहीर झाले नव्हते. गेल्या वर्षीच्या लिलावात बीएमडब्ल्यू मोटारीच्या एका लाकडी प्रतिकृतीस पाच लाख रुपयांची सर्वाधिक बोली आली होती. लिलावातून मिळणारे पैसे मोदींच्या इच्छेनुसार मुलींचे शिक्षण, अनाथालय यासारख्या कामांसाठी दिले जातात.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी