शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

दिल्ली-रांची राजधानी एक्स्प्रेसचा एक डबा आणि इंजिन रूळावरून घसरलं; जीवितहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 13:07 IST

दिल्ली-रांची राजधानी एक्सप्रेसचा एका डबा आणि इंजिन रूळावरून घसरलं असल्याची माहिती मिळते आहे.

ठळक मुद्देदिल्ली-रांची राजधानी एक्सप्रेसचा एका डबा आणि इंजिन रूळावरून घसरलं असल्याची माहिती मिळते आहे.रांचाहून दिल्लीला ही एक्स्प्रेस जात असताना अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे.

नवी दिल्ली, दि. 7- एक्स्प्रेसचे डबे रूळावरून घसरण्याचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. गुरूवारी सकाळी उत्तर प्रदेशात सोनभद्रमध्ये शक्तीपुंज एक्स्प्रेसचे सात डबे रूळावरून घसरल्याची घटना घडली असताना नवी दिल्लीतही अपघात झाल्याचं वृत्त आहे. दिल्ली-रांची राजधानी एक्सप्रेसचा एका डबा आणि इंजिन रूळावरून घसरलं असल्याची माहिती मिळते आहे. रांचाहून दिल्लीला ही एक्स्प्रेस जात असताना अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे. दिल्लीतील शिवाजी पुलाजवळ ही घटना घडली आहे. गुरूवारी सकाळी पावणे बाराच्या सुमारास हा अपघात झाल्याचं समजतं आहे. पण सुदैवाने कुठलिही जीवितहानी झालेली नाही. 

एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरल्याची आजच्या दिवसातील ही दुसरी घटना आहे. आज सकाळी  उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये  सकाळी सहा वाजता रेल्वे अपघात झाला. हावडा-जबलपूर शक्तिपुंज एक्स्प्रेसचे सात डबे रूळावरून घसरले. उत्तर प्रदेशच्या सोनभद्र-ओबराच्या जवळ असलेल्या छपराकुंड स्टेशन जवळ हा अपघात झाला होता. पण सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झालेली नाही. रेल्वे रूळाला तडे गेल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून एक्स्प्रेसचे डबे रूळावरून घसरत असल्याच्या घटना घडत आहेत. रेल्वे अपघातांची जबाबदारी स्विकारत सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात आणि त्यानंतरच्या खातेवाटपात पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

उत्तर प्रदेशात उत्कल एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरुन अपघात; २३ ठार, ४0 जखमीउत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर जिल्ह्यात खतौली येथे शनिवारी सायंकाळी पुरी-हरिद्वार उत्कल एक्स्प्रेसचे १४ डबे रुळावरून घसरून २३ प्रवासी मृत्युमुखी पडले आणि ४0 हून अधिक जखमी झाले. उत्कल एक्स्प्रेस अपघात प्रकरणी 13 रेल्वे कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबन करण्यात आलेल्या कर्मचा-यांमध्ये कनिष्ठ अभियंत्याचाही समावेश आहे. निलंबित करण्यात आलेला कनिष्ठ अभियंता आणि हॅमरमॅन यांच्यासहित 11 कर्मचारी कोणतीही परवानगी न घेता अपघात झाला त्या ठिकाणी देखभाल आणि दुरुस्तीची कामे करत होते. 

उत्तर प्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरुन अपघात, 74 प्रवासी जखमीउत्तर प्रदेशातील आझमगडहून दिल्लीला रवाना झालेल्या कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाला असून एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरुन घसरले होते. उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात 12225 (अप) कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाल. अछल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मानवरहीत क्रॉसिंगजवळ रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी फाटक क्रॉस करणा-या डंपरला कैफियत एक्स्प्रेसने धडक दिली. यावेळी कैफियत एक्स्प्रेसचे इंजिनसह दहा डबे रुळावरुन खाली घसरले. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात त्यात ७४ प्रवासी जखमी झाले. 

उत्तर प्रदेशात वाराणसीकडे जाणा-या मालगाडीचा अपघात,  घसरले 4 डबे 

अलाहाबादहून वाराणसीकडे जाणा-या मालगाडीचे चार डबे रुळावरुन घसरले होते. शनिवारी (2 सप्टेंबर) संध्याकाळी ही दुर्घटना घडली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वाराणसीजवळ असलेल्या हरदत्तपूर रेल्वे स्टेशन परिसरात या मालगाडीचे चार डबे घसरले. या अपघातानंतर वाराणसी-अलाहाबाद मार्ग वाहतुकीसाठी पूर्णतः ठप्प झाला होता. यामुळे अन्य गाड्यांचे वेळापत्रक कोलमडलं.  या दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे