शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख विद्यार्थ्यांनी दिली जेईई अ‍ॅडव्हान्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:59 IST

यंदाच्या प्रवेश परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी कानपूरकडे होती.

मुंबई : यंदाच्या जेईई अ‍ॅडव्हान्स प्रवेश परीक्षेला सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. अभियांत्रिकी तसेच आयआयटीसाठीची ही प्रवेश परीक्षा आॅनलाइन पद्धतीने घेण्यात आली. रविवारी सकाळी ९ ते दु. १२ आणि दु. २ ते सायं. ५ अशा दोन सत्रात ही परीक्षा पार पडली.यंदाच्या प्रवेश परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी आयआयटी कानपूरकडे होती. एकूण १,६६,२०४ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन परीक्षा दिली. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही एकूण ५४ प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, पेपर-१ची गुणसंख्या मात्र १८३ वरून १८० करण्यात आली. आॅनलाइन पद्धतीने परीक्षेसाठी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेण्यात आली. पेपर-१साठी स. ७.३० तर पेपर-२ साठी दु. १२.४५ वाजताच विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. आॅनलाइन पद्धतीने परीक्षा पार पडल्याने उत्तराचा पर्याय बदलण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे प्रश्न कठीण असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. आज झालेल्या प्रवेश परीक्षेचे आदर्श उत्तरांची यादी २९ मे रोजी जेईईच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली जाणार आहे.अपेक्षेप्रमाणे यंदाची जेईई अ‍ॅडव्हान्स प्रवेश परीक्षा कठीण होती. अनेक विद्यार्थ्यांनी त्याबाबत निराशा व्यक्त केली आहे. नकारात्मक गुणपद्धतीच्या प्रश्नांची संख्या जास्त होती. त्यामुळे जास्त गुण मिळविणे अवघड जाणार आहे. एकूणच यंदाच्या जेईईचा कट आॅफ घसरण्याची शक्यता राव आयआयटीचे कार्यकारी संचालक विनय कुमार यांनी वर्तविली आहे.

टॅग्स :educationशैक्षणिकexamपरीक्षा