शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

‘एक देश, एक निवडणूक’ घेण्यासाठी हवे दीड वर्ष, आवश्यक सामुग्रीसाठी लागणार १५ हजार कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:58 IST

One Nation, One Election: देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. याकरिता आवश्यक असलेल्या साधनसामग्रीसाठी १५ हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक तरतूदही लागेल.

- संजय शर्मानवी दिल्ली  - देशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाला किमान दीड वर्षाचा कालावधी लागणार आहे. याकरिता आवश्यक असलेल्या साधनसामग्रीसाठी १५ हजार कोटी रुपयांहून अधिक आर्थिक तरतूदही लागेल. लोकसभा आणि विधानसभेसोबतच नगरपालिका आणि पंचायत निवडणुका घेण्याबाबतही चर्चा सुरू आहे.

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ या संकल्पनेवर मंथनासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केलेली उच्चस्तरीय समिती पक्ष व सामाजिक संघटनांकडून यावर अभिप्राय घेत असून, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, आम आदमी पार्टीसह १७पक्षांनी याला विरोध केला आहे. केंद्र सरकारने एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीबाबत निवडणूक आयोगाकडून या महिन्याच्या सुरुवातीला सविस्तर अहवाल मागवला होता. सध्या आयोग साधनसामग्रीचा आढावा घेत आहे. 

लोकसभा व विधानसभा एकाच वेळी घेतली जाऊ शकते; पण तयारीसाठी आयोगाला किमान दीड वर्षाचा अवधी लागणार आहे. किमान ३० लाख ईव्हीएम, ४३ लाख बॅलेट संच आणि ३२ लाख व्हीव्हीपॅट यंत्रे लागतील. ही यंत्रे बनविणाऱ्या ईसीआयएल आणि बीईएल या कंपन्यांना आगाऊ ऑर्डर द्यावी लागेल. 

देशातील अंदाजे १२.५० लाख मतदान केंद्रांसाठी १५ लाखांहून अधिक व्हीव्हीपॅट लागणार आहेत. निवडणूक आयोगाला आजच ३५ लाख संचांचा तुटवडा जाणवत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास एका मतदान केंद्रावर दोन ईव्हीएम यंत्रे ठेवावी लागतील, तसेच राखीव संचही सज्ज ठेवावे लागतील. या यंत्रांवर १५ हजार कोटींहून अधिक खर्च होण्याची शक्यता आहे.  

कराव्या लागणार पाच घटनादुरुस्ती - ऑगस्ट २०१८ मध्ये मोदी सरकारने विधि आयोगाकडे एकाच वेळी निवडणुका घेण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर विधि आयोगाने निवडणूक आयोगाच्या सहकार्याने या योजनेचा कृती आराखडा तयार केला आहे. कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कायदामंत्री अर्जुनराम मेघवाल व इतर सदस्यांचा समावेश आहे.- या समितीच्या अनेक बैठका झाल्या आहेत. एकाचवेळी निवडणुकांसाठी पाच घटना दुरुस्त्या करण्याची गरज असून, त्यावरही विचार सुरू आहे. १९५२ पासून १९६७ पर्यंत देशात एकाच वेळी निवडणुका होत होत्या. मात्र, नंतर यात बदल झाला. 

टॅग्स :ElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग