शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दिवशी नवरा मेव्हणीला घेऊन पळाला; एकाचवेळी दोघींना लावलेला प्रेमाचा लळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 08:32 IST

लग्नाची तारीख निश्चित झाली, ६ ऑगस्टला लग्न होणार होते. सर्व तयारी झाली होती

बरेली – उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यात एक नवरी तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या नावाची मेहंदी लावून लग्नाच्या मुहूर्ताची वाट बघत होती. घरात लग्नाचे वातावरण असल्याने सगळीकडे आनंद पसरला होता. तेव्हा अचानक एक बातमी धडकते आणि लग्नासाठी जमलेल्या सर्व पै-पाहुण्यांमध्ये कुजबुज सुरू होते. नवरा-नवरीचे कुटुंब हैराण होते.

ही बातमी होती, लग्नाआधीच नवरा मेव्हणीला घेऊन पसार झाला. या घटनेने कुटुंबाला धक्का बसतो. नवऱ्याचे प्रेम प्रकरण नवरीसह तिच्या बहिणीसोबतही होते हे समोर येते. त्यात ऐन लग्नाच्या वेळेत नवरदेव मेव्हणीला घेऊन पळून जातो. बरेलीतील नवाबगंज परिसरातील ही घटना आहे. इथं राहणाऱ्या युवकाचं त्याच्या नात्यातील एका मुलीसोबत लग्न ठरले होते. लग्नासाठी दोन्ही कुटुंब तयारी करत होते. परंतु लग्नाच्या दिवशी नवरदेव होणाऱ्या नवरीच्या बहिणीला घेऊन पळून गेल्याची बातमी येते. इतकेच नाही तर नवऱ्याचे नवरीसोबतही अफेअर होते हे कळाल्याने कुटुंब हैराण झाले.

विशेष म्हणजे लग्नासाठी आधी दोन्ही कुटुंब नकार देत होते. मात्र दोघांनी कुटुंबाला समजवल्यानंतर लग्नाला त्यांनी होकार दिला. लग्नाची तारीख निश्चित झाली, ६ ऑगस्टला लग्न होणार होते. सर्व तयारी झाली होती. नवरा वऱ्हाडीमंडळीसोबत लग्नस्थळी पोहचला. परंतु लग्नाच्या विधी सुरू असतानाच तो मध्येच उठून गायब झाला. नवऱ्याला खूप ठिकाणी शोधले पण तो सापडला नाही. त्यानंतर नवरीची बहिणदेखील कुठे दिसत नव्हती. तेव्हा नवरदेव होणाऱ्या नवरीच्या बहिणीला घेऊन पळाला हे सगळ्यांचे लक्षात आले.

नवऱ्याचे एकाचवेळी नवरी आणि तिच्या बहिणीसोबत अफेअर होते. परंतु नवरी मुलीला त्याची भनकही नव्हती. या दोघांचा शोध आता घेतला जात आहे. हा प्रकार समोर येताच दोन्ही कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस नवरा आणि मेव्हणीचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट