शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद अझरुद्दीनवर गुन्हा दाखल; भारताच्या माजी कर्णधाराने आरोप फेटाळले, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 15:59 IST

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भ्रष्टाचारप्रकरणी भारताचा माजी कर्णधार अडचणीत सापडल्याचे दिसते. विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर टीम इंडियाची कमान सांभाळणाऱ्या अझरुद्दीनवर भ्रष्टाचाराचा हा डाग हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी संबंधित आहे. खरं तर मागील काही काळात अझरुद्दीनने एचसीए म्हणजेच हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून कारभार सांभाळला आहे. त्याने त्याच्या कार्यकाळात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, अझरुद्दीनने आपल्यावरील आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या सीईओने अझरुद्दीनविरोधात उप्पल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीत अझहर आणि इतर काही माजी अधिकार्‍यांवर HCA मध्ये काम करताना त्यांच्या पदाचा आणि पैशाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परंतु, या संपूर्ण प्रकरणाबाबत अझहरला विचारले असता त्याने हे आरोप फेटाळून लावले आणि आरोपांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे नमूद केले.

अझरुद्दीनने आरोप फेटाळलेभारताच्या माजी कर्णधाराने आपल्यावरील भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळले आणि या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्याने म्हटले की, मी मीडिया रिपोर्ट्स पाहिले आहेत. हे आरोप म्हणजे माझ्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न आहे. योग्य वेळ आल्यावर मी याविरोधात आवाज उठवीन आणि माझ्यावरील आरोपांना चोख उत्तर देईन. दरम्यान, अझहरवरील आरोप हे पैशांचे व्यवहार, अत्यावश्यक उपकरणांची खरेदी-विक्री आणि मालमत्तेचा गैरवापर करण्याशी संबंधित आहेत. मात्र, सध्या या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

टॅग्स :hyderabad-pcहैदराबादCorruptionभ्रष्टाचार