शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांना लोकशाही वाचवायची असेल तर..."; ECनं राहुल गांधींना बजवलेल्या नोटिशीवर काय म्हणाले खर्गे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 19:15 IST

"भारतीय टीम विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, मात्र पनौतीमुळे पराभव झाला," असे म्हणत, राहुल यांनी पीएम मोदींवर टीका केली होता.

संपूर्ण राजस्थान विधानसभा निवडणूक प्रचाराने ढवळून निघाला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच, गेल्या दोन दिवसांपूर्वी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी, क्रिकेट विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताच्या झालेल्या पराभवावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. "भारतीय टीम विश्वचषक स्पर्धा जिंकत होती, मात्र पनौतीमुळे पराभव झाला," असे म्हणत, राहुल यांनी पीएम मोदींवर टीका केली होता. त्यांच्या या वक्तव्यावरून निवडणूक आयोगाने त्यांना आज नोटीस बजावली आहे. यानंतर, आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी, "त्यांना (राहुल गांधींना नोटीस) पाठवू द्या, आम्ही उत्तर देऊ. ही फार मोठी गोष्ट नाही," असे म्हटले आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जुन खर्गेयासंदर्भात बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "त्यांना (राहुल गांधींना नोटीस) पाठवू द्या, आम्ही त्याला उत्तर देऊ. ही फार मोठी गोष्ट नाही. फार गंभीर भाष्य करण्यात आलेले नाही. आम्ही नोटिशीला उत्तर देऊ. आज ते निवडणूक काळात ज्या पद्धतीने घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते योग्य नाही. त्यांना लोकशाही वाचवायची असेल, तर त्यांनी एक समान मैदान द्यायला हवे. मात्र या ऐवजी ईडी, सीबीआय आदींचा वापर केला जात आहे..."

यासंदर्भात, निवडणूक आयोगाने 25 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत राहुल गांधी यांच्याकडून उत्तर मागवले आहे. तत्पूर्वी, भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल  कारवाईची मागणी केली होती.

राहुल गांधींनी माफी मागावीकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात केलेले अपमानास्पद विधान अस्वीकार्य असून त्याबद्दल त्यांना माफी मागावी लागेल, असे भाजप नेत्यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे पोहोचलेल्या शिष्टमंडळात राधामोहन दास अग्रवाल, ओम पाठक आणि इतर नेत्यांचा समावेश होता.

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेRahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग