शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Omicron News: टेन्शन वाढणार! भारतात ओमायक्रॉन वेगानं पसरणार; 'त्या' तज्ज्ञांची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 11:59 IST

Omicron News: देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ३८ वर; ६ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांत आढळले रुग्ण

नवी दिल्ली: देशाच्या चिंतेत ओमायक्रॉननं भर घातली आहे. आतापर्यंत देशात ओमायक्रॉनचे ३८ रुग्ण आढळले आहेत. ६ राज्यं आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेतील तज्ज्ञानं केलेल्या भविष्यवाणीनं सगळ्यांची चिंता वाढली आहे. 

भारतात ओमायक्रॉनचा फैलाव वेगानं होईल, असा अंदाज SACEMAच्या संचालिका ज्युलिएट पुलियम यांनी वर्तवला आहे. इकॉनॉमिक टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा अंदाज वर्तवला. भारतानं वाईटातल्या वाईट परिस्थितीचा सामना करण्याची तयारी ठेवायला हवी. ओमायक्रॉन आधीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत कितीतरी अधिक वेगानं पसरत आहे. लसीकरण झालेल्या व्यक्तींनादेखील ओमायक्रॉनची लागण होत आहे, असं पुलियम यांनी सांगितलं.

दक्षिण आफ्रिकेत जे पाहायला मिळालं, ते आता जगातील इतर भागांत बघायला मिळतंय. भारतात ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगानं पसरेल, असं पुलियन म्हणाल्या. 'रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना ओमायक्रॉन आधीच्या व्हेरिएंटप्रमाणेच आजारी पाडेल. ओमायक्रॉन लसीचा प्रभाव कमी करत आहे. फायझरचा बूस्टर डोस या व्हेरिएंटविरोधात थोडी सुरक्षा देतो, असं ब्रिटनमध्ये दिसून आलं आहे,' असं त्यांनी सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढवणारी भविष्यवाणीओमायक्रॉन व्हेरिएंट कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा प्रभाव कमी करण्यास सक्षम आहे आणि तो वेगानं हातपाय पसरत आहे. डेल्टा बाधितांच्या संख्येपेक्षा ओमायक्रॉन बाधितांची संख्या लवकरच वाढेल. ओमायक्रॉन जास्त संक्रामक असल्यानं तो रुग्ण संख्येच्या बाबतीत डेल्टाला मागे टाकेल, असा अंदाज डब्ल्यूएचओनं वर्तवला आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वेगानं पसरतो. ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर लसीचा प्रभाव कमी होतो. ओमायक्रॉनच्या बाबतीत लक्षणं कमी दिसतात, अशी माहिती समोर आल्यानं वैद्यकीय विश्वाची काळजी वाढली आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या