शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

'पहिला नोटाबंदी मग कोरोना नंतर लॉकडाऊन'; ओमायक्रॉनला घाबरून व्यापाऱ्याची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 20:54 IST

CoronaVirus News : ओमायक्रॉनला घाबरून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

नवी दिल्ली  - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.  गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,822 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 220 जणांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनने चिंतेत भर टाकली आहे. देशामध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. ओमायक्रॉनला घाबरून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील छतरपूर येथील एका कापड व्यापाऱ्याने कोरोना, ओमायक्रॉनला घाबरून विष घेतलं केले. या भयंकर प्रकाराची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर व्यापाऱ्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे तणाव असल्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. छतरपूर जिल्ह्यातील खडगाय गावात राहणारे कापड व्यापारी अंशुल विनय शर्मा यांचे गावातच दुकान आहे.

"पहिला नोटाबंदी मग कोरोना नंतर लॉकडाऊन"

कोरोनामुळे व्यापाऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. भविष्यासाठी साठवून ठेवलेले सर्व पैसे देखील संपले. काही पैसे होते त्यातून त्यांनी नवीन माल आणला. अशा स्थितीत तिसरी लाट आल्यावर पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची त्यांनी भीती वाटू लागली. कुटुंबाची चिंता सतावू लागली. याच तणावातून व्यापाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्येचा प्रयत्न केला. "पहिला नोटाबंदी मग कोरोना नंतर लॉकडाऊन तसेच कोरोनाची दुसरी लाट... सामान्य माणूस आणि व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. आधीच तुटलो आहे आता हिंमत नाही"

"व्यवसाय आणि कौटुंबिक पालनपोषणाच्या काळजीने मी घाबरलो"

"आधीच झालेलं मोठं नुकसान. दोन वर्षांपूर्वीच लग्न झालं आहे. दीड वर्षाची मुलगी आहे. व्यवसाय आणि कौटुंबिक पालनपोषणाच्या काळजीने मी खूप जास्त घाबरलो होतो" अशी माहिती व्य़ापाऱ्याने दिली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ओमायक्रॉनच्या भीतीने प्राध्यापकाने पत्नी आणि मुलांची हत्या केली आहे. त्याच्या खोलीतून एक अतिशय धक्कादायक नोट सापडली आहे. त्यात प्राध्यापकाने ओमाय़क्रॉन सर्वांना मारेल. यापुढे मृतदेहांची गणना नाही असं म्हटलं आहे. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर प्राध्यापकाने आपल्या भावाला व्हॉट्सएपवरून घटनेची माहिती दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन