शहरं
Join us  
Trending Stories
1
Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 
2
Shivaji Kardile: दूधाच्या व्यवसायापासून सुरुवात ते जिल्ह्यातील राजकारणात दबदबा; कोण होते शिवाजी कर्डिले?
3
पेट्रोलला पर्याय! देशातील सर्वात स्वस्त ५ इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त ३.२५ लाखांपासून सुरू; दमदार फीचर्स
4
Diwali 2025 Special Train: कोकणवासीयांची दिवाळी गोड! प्रवास वेगवान, ट्रेनही वाढणार; नवीन वेळापत्रक आले, तुम्ही पाहिले?
5
'या' शेअरची धमाकेदार एन्ट्री; ₹१४५ रुपयांवर लिस्ट झाला आयपीओ, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
6
धक्कादायक! विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार; आरोपीने फोन करुन विचारले-गर्भनिरोधक गोळी देऊ का?
7
महायुती सरकारने केली शेतकऱ्यांची फसवणूक, शेतकऱ्यांची दिवाळी काळी; काँग्रेसची बोचरी टीका
8
नितीश कुमार 25 तर भाजप..; बिहार निवडणुकीत कोण किती जागा जिंकेल? प्रशांत किशोर म्हणाले...
9
पलंगावर मृतदेह अन् हातातल्या मोबाईलवर फ्री फायर गेम सुरू; अवघ्या १३ वर्षांच्या मुलासोबत नेमकं काय घडलं?
10
'न्यायालयांनी संयम बाळगावा; प्रत्येक प्रकरणात CBI चौकशीचे आदेश देणे अयोग्य'- सुप्रीम कोर्ट
11
Gen Z आंदोलनाचा उडाला भडका, आणखी एका देशात सत्तांतर; कर्नल बनले राष्ट्रपती, लष्कर चालवणार देश
12
आसाममधील तिनसुकिया येथील लष्करी छावणीवर दहशतवादी हल्ला, तीन जवान गंभीर जखमी
13
गेल्या ३ महिन्यात ८ टॉप कमांडरनं दिले राजीनामे; अमेरिकन सैन्यातून बडे अधिकारी नोकरी का सोडतायेत?
14
"हिला काय कळतंय? ही मूर्ख आहे...", गावावरुन आलेल्या माधवीला हिणवायचे लोक, म्हणाली- "मला नातेवाईकांनीही..."
15
गुरुद्वादशी २०२५: श्रीपाद श्रीवल्लभ यांचा स्मरण दिन; ३० वर्षांचे अद्भूत अवतार कार्य! वाचा
16
इरफान खानच्या 'द लंचबॉक्स'चा सीक्वेल येणार? 'हा' अभिनेता साकारु शकतो भूमिका
17
टाटा कंपनीचा 'हा' स्टॉक झुनझुनवाला कुटुंबासाठी ठरला मल्टीबॅगर; एका दिवसात ४०० कोटींचा नफा
18
प्रसिद्ध अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने केलं दुसरं लग्न, गुलाबी साडीत दिसतेय सुंदर; कोण आहे ही?
19
Rahul Gandhi : राहुल गांधी पोहोचले हरिओम वाल्मिकी यांच्या घरी, कुटुंबाने भेटायला दिला होता नकार; नेमकं प्रकरण काय?
20
Diwali 2025: अश्विन वद्य द्वादशीलाच वसुबारस का? कोणत्या गायीला हा सण समर्पित आहे माहितीय?

Omicron Variant : "लिंबाच्या रसाने पळून जाईल कोरोना"; ओमायक्रॉनच्या संकटात भाजपा नेत्याचं अजब विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 14:47 IST

BJP Devi Singh Bhati And Corona Virus : ओमायक्रॉनने टेन्शन वाढवलेलं असताना भाजपा नेत्याने एक अजब विधान केलं आहे. "लिंबाच्या रसाने कोरोना पळून जाईल" असं म्हटलं आहे. 

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान आता नव्याने आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने चिंतेत भर पडली आहे. याच दरम्यान कोरोनातून बरं होण्यासाठी अजब उपाय केले जात आहेत. विविध सल्ले देण्यात येत आहेत. यातच आता भाजपा नेत्यांच्या विधानांची भर पडली आहे. ओमायक्रॉनने टेन्शन वाढवलेलं असताना भाजपा नेत्याने एक अजब विधान केलं आहे. "लिंबाच्या रसाने कोरोना पळून जाईल" असं म्हटलं आहे. 

माजी मंत्री देवी सिंह भाटी (BJP Devi Singh Bhati) यांनी कोरोनावरील उपायांबाबत अजब विधान केले. "लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते" असा दावा त्यांनी केला. जोधपूर सर्किट हाऊस प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना असं म्हटलं आहे. "लिंबाच्या रसाचे दोन थेंब हे नाकामध्ये टाका आणि पाच सेकंद ठेवा, पाच मिनिटांनंतर कोरोना हळू हळू कमी होईल. दोन तासांनी तुम्हा ऑक्सिजन सपोर्टदेखील गरज भासणार नाही. तसेच रुग्णालयात असल्यास  दोन तीन दिवसांनी डिस्चार्ज देखील मिळेल. अ‍ॅलोपथीमध्ये कोरोनावर उपचार नाहीत" असं देखील देवी सिंह भाटी यांनी म्हटलं आहे. 

"अ‍ॅलोपथीमध्ये कोविड 19 वर कोणताही इलाज नाही"

आयुर्वेदाचं महत्त्व सांगताना भाटी यांनी अ‍ॅलोपथीबाबत बेछूट विधान केले. "अ‍ॅलोपथीमध्ये कोविड 19 वर कोणताही इलाज नाही. कोविड होऊन अनेक डॉक्टरांचाही मृत्यू झाला आहे. अशावेळी आयुर्वेद पद्धतीवर विश्वास दाखवायला हवा. आयुर्वेदात प्रत्येक आजारावर मात करण्याची क्षमता आहे. लिंबाचे दोन थेंबही कोरोनातून बरे होण्यास फायदेशीर ठरतात" असं म्हटलं आहे. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं. त्याने इम्युनिटी वाढण्यास मदत होते. इम्युनिटी चांगली असेल तर कोरोनाचा प्रतिकार करताना फायदा होतो. मात्र फक्त लिंबाचा रस हा कोरोनावरील उपाय नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"टंट्या मामाचं ताबीज करणार रक्षण, कोणताही आजार होईल बरा"

सांस्कृतिक व पर्यटन मंत्री उषा ठाकूर (Usha Thakur) यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. तसेच त्यांनी रोगापासून संरक्षण होण्यासाठी लोकांना अजब सल्ला दिला आहे. सध्या ठाकूर यांच्या विधानाचीच जोरदार चर्चा रंगली आहे. "टंट्या मामाचं ताबीज आपलं संरक्षण करेल. कोरोना काळात लाखोंची गर्दी एकत्र आली तरी मामाचं ताबीज असल्यामुळे कोणालाही काहीही होणार नाही, कोणताही आजार असेल तर तो देखील बरा होईल" असं विधान आता उषा ठाकूर यांनी केलं आहे. मध्यप्रदेशमध्ये टंट्या मामा भिल यांचा बलिदान दिवस दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा करण्यात येतो. आदिवासी समाजातील लाखो बांधव यावेळी एकत्र येत असतात. सर्वसामान्य नागरिकांसाठी आस्थेचं स्थान असलेल्या या उत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमू नये, यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. याच दरम्यान उषा ठाकूर यांनी हे विधान केलं आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉन