शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant : ओमायक्रॉन व्हेरिएंटची धास्ती! केंद्राकडून सहा राज्यांना अलर्ट, पत्राद्वारे दिल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 16:27 IST

Omicron Variant : केंद्रीय आरोग्य सचिवांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या धोक्याबाबत सहा राज्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत सापडलेला ओमायक्रॉन ( Omicron) हा कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आता जगातील 38 देशांमध्ये पोहोचला आहे. भारतातही या नवीन कोरोना व्हेरिएंटची लागण झालेले तीन लोक सापडले आहेत. या व्हेरिएंटला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिवांनी ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या धोक्याबाबत सहा राज्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. या सहा राज्यांमध्ये केरळ, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, कर्नाटक, ओडिशा आणि मिझोराम यांचा समावेश आहे.

या राज्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे आरोग्य मंत्रालय चिंतेत आहे. केंद्राने राज्यांना टेस्ट, ट्रॅक, उपचार, लसीकरण आणि कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, केरळमध्ये कोरोनामुळे रुग्णांचा वाढता मृत्यूदर आणि वाढत्या रुग्णांवर आरोग्य मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. याचबरोबर, जम्मू-काश्मीरमधील चार जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण वाढत आहेत. तसेच, तामिळनाडूतील तीन आणि कर्नाटकातील चार जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. अशीच स्थिती ओडिशा आणि मिझोरामची आहे. येथेही आरोग्य मंत्रालयाने काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये वाढ झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना व्हायरसच्या या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे.  आतापर्यंत 30 हून अधिक देश या नवीन व्हेरिएंटच्या कचाट्यात आले आहेत. भारतही ओमायक्रॉन व्हेरिएंट संसर्गाची लागण झालेल्या देशांच्या यादीत सामील झाला आहे. भारतात गुरुवारी (दि.03) कोरोना कर्नाटकात ओमायक्रॉन व्हेरिएंट संक्रमितदोन रुग्ण आढळले आहेत. यानंतर आता गुजरातमधील जामनगरमध्ये (Jamnagar)  एका व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळून आले आहे. ही व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतली होती. 

दक्षिण आफ्रिकेत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन व्हेरिएंटला B.1.1529 असे ओळखले जात होते. नंतर जागतिक आरोग्य संघटनेने त्याला ‘Omicron’ असे नाव दिले. हा ग्रीक शब्द आहे (Omicron is a Greek word).जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, ज्या पहिल्या नमुन्यातून ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता, त्याची चाचणी 9 नोव्हेंबर रोजी करण्यात आली होती. तसेच, या कोरोनाच्या व्हायरसचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या व्हेरिएंटच्या यादीत केला आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लस