शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Omicron In India: ओमायक्रॉन पसरू लागला? एका रुग्णाच्या संपर्कात आलेले पाच जण पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 19:33 IST

Omicron Case Found In India: कोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडल्याने दक्षिण आफ्रिकेने 26 नोव्हेंबरला जगाला सावध केलेले. मात्र, त्या आधीच हा व्हेरिअंट अस्तित्वात असल्याने तो जगभरात पसरू लागला होता. भारतात या व्हेरिअंटचे रुग्ण आधीच दाखल झाले होते.

देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने प्रवेश केला आहे. जेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉन सापडला त्याच्या आधीच या व्हेरिअंटने भारतात प्रवेश केला होता. आफ्रिकेतून दोघे बाधित कर्नाटकातील बंगळुरूमध्ये आले होते. आता त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी 22 आणि 25 नोव्हेंबरला घेण्यात आली होती. त्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते. 

बंगळुरु महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकात आलेल्या दोन परदेशी व्यक्तींना ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. यापैकी 46 वर्षीय व्यक्तीच्या थेट संपर्कात तिघे जण आले होते. तर या तिघांच्या संपर्कात आणखी दोघे जण आले होते. या पाचही जणांची 22 आणि 25 नोव्हेंबरला कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये पाचही जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र, 46 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉनची बाधा झालेली असल्याचे आज समजले आहे. यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या पाचही जणांची पुन्हा चाचणी करण्यात आली आहे. बंगळुरु पालिकेने ते कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांना आयसोलेट केल्याचे म्हटले आहे. 

खबरदारीचा उपाय म्हणून या पाचही जणांच्या स्वॅबचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत. याचा अहवालाची वाट पाहत असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेहून आलेले दोन्ही रुग्ण हे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले म्हणजेच पूर्ण व्हॅक्सिनेटेड होते. तसेच ते आफ्रिकेतून दुबईमार्गे भारतात आले होते. 

दुसरा रुग्ण भारत सोडून गेला...

ओमायक्रॉनने संक्रमित 66 वर्षीय रुग्ण हा भारतात सापडलेला पहिला रुग्ण आहे. तो पहिल्यांदा भारतात आला होता. कोरोना चाचणीत तो पॉझिटिव्ह सापडला होता. यामुळे त्याच्यावर बंगळुरुमध्येच उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर तो पुन्हा मायदेशी परतला आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. परंतू दुसऱ्या रुग्णाने टेन्शन वाढविले आहे. त्याच्या संपर्कात आलेले पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. 

दक्षिण आफ्रिकेने जगाला सावध केलेलेकोरोनाचा नवा व्हेरिअंट सापडल्याने दक्षिण आफ्रिकेने 26 नोव्हेंबरला जगाला सावध केलेले. मात्र, त्या आधीच हा व्हेरिअंट अस्तित्वात असल्याने तो जगभरात पसरू लागला होता. भारतात या व्हेरिअंटचे रुग्ण आधीच दाखल झाले होते. परंतू तेव्हा हा व्हेरिअंट सुप्तावस्थेत होता. जगभरात खळबळ उडाल्यानंतर या व्हेरिअंटची लागण झालीय का याची जिनोम सिक्वेंसिंगद्वारे तपासणी करण्यात आली तेव्हा या दोघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटक