शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
2
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
3
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
4
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
5
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
6
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
7
रागाच्या भरात परेश रावल यांनी गमावले भान! म्हणाले, 'एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड...'
8
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
10
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
11
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
12
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
13
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
14
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
15
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
16
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
17
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
18
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
19
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
20
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...

Omicron : ओमायक्रॉन नाही, कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अजूनही देशात सर्वात धोकादायक, आयसीएमआरचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 15:45 IST

Omicron : भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत असली, तरी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) म्हणणे आहे की, सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंट धोकादायक नाही.

नवी दिल्ली : भारतातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) ओमायक्रॉन व्हेरिएंटची (Omicron Variant) प्रकरणे मंगळवारी 200 वर पोहोचली आहेत. आतापर्यंत देशातील 12 राज्यांमध्ये ओमायक्रॉन पसरला आहे. तसेच, या राज्यांमध्ये ओमायक्रॉनपासून जवळपास 77 रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची 54-54 प्रकरणे आहेत, तर तेलंगणामध्ये 20, कर्नाटकात 19, राजस्थानमध्ये 18 , केरळमध्ये 15  आणि गुजरातमध्ये 14  ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली आहेत.

भारतात ओमायक्रॉनची प्रकरणे वेगाने वाढत असली, तरी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (ICMR) म्हणणे आहे की, सध्या ओमायक्रॉन व्हेरिएंट धोकादायक नाही. आयसीएमआरचे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा हे देशात समोर येत असलेल्या मृत्यू आणि कोरोना प्रकरणांवर म्हणाले, ओमायक्रॉन रुग्णांची वाढ होण्याची शक्यता फार कमी आहे. मात्र, आधीच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे प्रकरणे वाढत आहेत. ओमायक्रॉन व्हेरिएंट विदेशी प्रवाशांद्वारे पसरू शकतो. अशा परिस्थितीत सरकारकडून विमानतळ आणि प्रवेश मार्गांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, डॉ. समीरन पांडा यांचे असे म्हणणे आहे की, रविवारी दिल्लीतील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण लसीकरण देखील संसर्गाविरूद्ध प्रभावी सिद्ध होत नाही. आता राज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावण्याची गरज आहे. ओमायक्रॉनची प्रकरणे वाढू शकतात, त्यामुळे हे गरजेचे नाही की गंभीर संसर्गाचा ताण येईल. ओमायक्रॉनच्या 100 गंभीर प्रकरणांपैकी बहुतेक प्रकरणे प्रवासाशी संबंधित आहेत.

दरम्यान, मंगळवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोना व्हायरसची 5,326 नवीन प्रकरणे आढळून आली आहेत, जी 581 दिवसांतील संसर्गाची सर्वात कमी संख्या आहे आणि यासह संसर्गाच्या एकूण प्रकरणांची संख्या 3,47,52,164 वर पोहोचली आहे. तसेच, रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 79,097 वर आली आहे, जी 574 दिवसांतील सर्वात कमी आहे.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या