शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

 OMG! अर्ध्या वाटेवरूनच बेपत्ता झाली पुणे-गोरखपूर जनसाधारण विशेष एक्स्प्रेस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2018 09:26 IST

अनेक आश्चर्यांनी भरलेल्या आपल्या देशात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. आतातर अख्खी रेल्वेच अर्ध्या वाटेवरून बेपत्ता झाल्याची आश्चर्यकारक आणि तेवढीच धक्कादायक घटना घडली आहे.

लखनौ  - अनेक आश्चर्यांनी भरलेल्या आपल्या देशात कधी काय होईल, हे सांगता येत नाही. आतातर अख्खी रेल्वेच अर्ध्या वाटेवरून बेपत्ता झाल्याची आश्चर्यकारक आणि तेवढीच धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार गुरुवारी उत्तर प्रदेशातील कानपूर आणि लखनौदरम्यान घडला. पुण्याहून गोरखपूरला निघालेली विशेष ट्रेन गुरुवारी नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टिमवर दिसायची बंद झाली. त्यामुळे ही ट्रेन नेमकी कुठे आहे हे रेल्वे अधिकाऱ्यांनाही कळेनासे झाले. ट्रेनबाबत माहिती मिळत नसल्याने रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली. तसेच प्रवाशांचाही गोंधळ उडाला.  पुणे गोरखपूर जनसाधारण स्पेशल ट्रेन-01453 दर रविवारी पुण्याहून गोरखपूरसाठी चालवली जाते. ही गाडी तीन दिवस प्रवास करून गोरखपूरला पोहोचते. मात्र या आठवड्यात ही गाडी सुमारे 26 तास उशिराने सोमवारी रात्री 8 वाजता पुण्याहून रवाना झाली. ही ट्रेन अहमदनगर, मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, झाशी असा प्रवास करत 24 एप्रिल रोजी सकाळी 7.38 वाजता कानपूरला पोहोचली. प्रवासाच्या पहिल्या दिवशी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर एनटीइएसने ट्रेन किती वाजता कुठे पोहोचली याची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर मात्र ट्रेनचे लोकेशन मिळणे बंद झाले.  तपास केल्यावर पुणे गोरखपूर जनसाधारण स्पेशल ट्रेन एनटीईएसवर 24 एप्रिल रोजी सकाळी कानपूरच्या गुड्स मार्शलमध्ये उभी असल्याचे सांगितले जात होते. पुढे या ट्रेनचे काय झाले याची माहिती मात्र मिळत नव्हती. तीन दिवस उलटल्यानंतही ही ट्रेन लखनौला पोहोचलेली नाही. कंट्रोल रूमपासून रेल्वेच्या अधिकाऱ्यांपर्यंत कुणालाही ट्रेन कुठे गेली याची माहिती कुणालाही नाही. एनटीसईएसवर तपासले असता 24 एप्रिलपासून आतापर्यंत ही ट्रेन कानपूर गुड्स मार्शलमध्येच उभी असल्याचे दिसत आहे. सोबतच ही ट्रेन चालवण्यात येत आहे, पण पुढे येत नसल्याचेही सांगण्यात येत आहे. तसेच रेल्वे प्रशासन या प्रकरणी काहीही बोलणे टाळत आहे. मग ट्रेन धावलीच नाही? हे संपूर्ण प्रकरण एनटीईएसमधील गोंधळाचे आहे, असा दावा सूत्रांनी केला आहे.  ही ट्रेन सोर्स स्टेशन पासून चालवण्यातच आली नसल्याचेही बोलले जात आहे. मात्र अचानक रद्द करण्यात आलेली ही ट्रेन एनटीईएसवर मात्र धावत आहे.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेUttar Pradeshउत्तर प्रदेशIndiaभारतJara hatkeजरा हटके