शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सोलर घोटाळ्यामुळे ओमेन चंडी अडचणीत, केरळ सरकारने दिले तपासाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 14:51 IST

केरळमधील सोलर घोटाळ्यातील आरोपींना मदत केल्याचा ठपका ठेवत डाव्या आघाडीच्या सरकारने माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांच्या तपास व चौकशीचे (व्हिजिलन्स प्रोब) आदेश दिले आहे.

ठळक मुद्देमागील आठवड्यात केरळ सरकारला सादर केलेल्या अहवालात चंडी आणि त्यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांनी सोलर घोटाळ्यातील आरोपींना मदत केल्याचे नमूद केल्याचे मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले.

तिरुवनंतपुरम- केरळमधील सोलर घोटाळ्यातील आरोपींना मदत केल्याचा ठपका ठेवत डाव्या आघाडीच्या सरकारने माजी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांच्या तपास व चौकशीचे (व्हिजिलन्स प्रोब) आदेश दिले आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री पीनारायी विजयन यांनी निवृत्त न्यायाधीश शिवराजन यांनी दिलेल्या अहवालानंतरच हा निर्णय घेतल्याचे सर्वांना सांगितले. केरळमध्ये कॉंग्रेस सत्तेवर असताना 2013 साली प्रथम तो उघड झाला होता.

मागील आठवड्यात केरळ सरकारला सादर केलेल्या अहवालात चंडी आणि त्यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांनी सोलर घोटाळ्यातील आरोपींना मदत केल्याचे नमूद केल्याचे मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले. टीम सोलर कंपनीच्या सरिता एस नायरकडून कॉंग्रेस नेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाच घेतल्याचे सांगण्यात येते. आपल्या राजकीय संबंधांचा वापर करुन ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप नायरवर ठेवण्यात आला आहे. यामध्ये चंडी यांना मदत करणाऱ्या तत्कालीन गृहमंत्री पदावर असणाऱ्या तिरुवंचूर राधाकृष्णन यांच्यावर खटला चालवण्यात येईल अशी माहिती केरळ सरकारकडून देण्यात आली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले या अहवालात चंडी यांच्यासह इतर नेत्यांबाबतही तपास करण्याची सूचना केली आहे. सरिताने अर्यदन मुहम्मद, ए.पी. अनिल कुमार, अदूर प्रकाश, हाबी एडन, पालणी मनिक्यम, एन. सुब्रमण्यम, के. सी. वेणूगोपाल, जोस के मणी यां नेत्यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केले असे 2013 साली लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते. त्यामुळे बलात्काराचा गुन्हा नोंदवूनही तपास केला जाणार आहे.पिनारायी यांच्या या विधानांवर कॉंग्रेसचे केरळमधील ज्येष्ठ नेते ए. के. अॅंटनी यांनी सीपीएम अत्यंत खालच्या पातळीचे राजकारण करत असल्याचे मत व्यक्त करत, सरकारने अहवालातील सर्व सूचना उघड कराव्यात अशी मागणी केली आहे.

टॅग्स :keralकेरळ