शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत धार्मिक घोषणाबाजी चालू देणार नाही : लोकसभा अध्यक्ष बिर्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 10:28 IST

याआधी संसदेत धार्मिक घोषणा देण्यासंदर्भात पहिल्यांदाच लोकसभेत गेलेल्या नवनीत कौर राणा यांनी आपले मत मांडले. संसदेत जय श्री रामच्या घोषणा देणे योग्य नसल्याचे राणा यांनी म्हटले होते.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत शानदार विजय मिळवत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा सत्तेवर विराजमान झाला आहे. त्यानंतर ठरल्याप्रमाणे भाजपसह सर्व लोकसभा सदस्यांनी लोकसभेत सदस्यपदाची शपथ घेतली. मात्र हा शपथविधी धार्मिक नारेबाजीमुळे चांगलाच गाजला आहे. त्यावर भाजपकडून नियुक्त करण्यात आलेले नवे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आक्षेप घेतला आहे.

नवनिर्वाचित खासदारांच्या शपथविधी कार्यक्रमात एमआयएमचे खासदार असुद्दीन ओवेसी शपथ घेत असताना भाजपच्या काही नेत्यांकडून 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यात आल्या. त्याला प्रत्युत्तर देताना ओवेसी यांनी देखील 'अल्लाहू अकबर'च्या घोषणा दिल्या. त्यामुळे लोकसभेला धार्मिक आखाड्याचे रुप येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

यावर लोकसभा अध्यक्ष बिर्ला म्हणाले की, माझ्या मते संसद भवन धार्मिक नारेबाजी करण्याचं ठिकाण नक्कीच नाही किंवा प्लेकार्ड दाखवणे आणि वेलमध्ये यायचं, असही ठिकाण नाही. घोषणाबाजी करण्यासाठी एक विशिष्ठ ठिकाणं आहेत. तिथे जावून तुम्ही प्रदर्शन करू शकता, किंवा घोषणाबाजी करू शकता. उपस्थित सदस्य सरकारवर टीका करू शकतात. परंतु, लोकसभेत गॅलरीत येऊन घोषणाबाजी करणे योग्य नसल्याचे बिर्ला यांनी नमूद केले.

दरम्यान संसदेत धार्मिक घोषणाबाजी होणार नाही अस आश्वासन तुम्ही देऊ शकतात का, असा प्रश्न बिर्ला यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मला ठावूक नाही, भविष्यात पुन्हा असं काही घडेल. मात्र मी नियमानुसार संसदेचे कामकाज पार पाडणार आहे. सर्वच पक्षांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे. अशा परिस्थितीत त्यांचा विश्वास कायम राखणे माझ कर्तव्य असल्याचे बिर्ला म्हणाले.

याआधी संसदेत धार्मिक घोषणा देण्यासंदर्भात पहिल्यांदाच लोकसभेत गेलेल्या नवनीत कौर राणा यांनी आपले मत मांडले. संसदेत जय श्री रामच्या घोषणा देणे योग्य नसल्याचे राणा यांनी म्हटले होते.