शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

Farmer Protest: गावी सोडलेले आजोबा परत आले, राकेश टिकैतनी खांद्यावर मारले अन् निघाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2021 3:33 PM

Farmer Protest: कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन गेल्या ७० दिवसांपासून सुरु आहे. दिल्ली-युपीच्या गाझीपूर सीमेवर याचे केंद्र बनले आहे. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आता देशभराच्या नजरा भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांच्यावर लागलेल्या आहेत.

कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन गेल्या ७० दिवसांपासून सुरु आहे. दिल्ली-युपीच्या गाझीपूर सीमेवर याचे केंद्र बनले आहे. 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर आता देशभराच्या नजरा भारतीय किसान युनियनच्या राकेश टिकैत यांच्यावर लागलेल्या आहेत. येत्या 6 जानेवारीला म्हणजे उद्या देशभर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहेत. (Farmer Protest continue for 70 days, on Saterday farmers called chakka jam in country.)

या पार्श्वभूमीवर आज आंदोलनस्थळी एक वेगळेच दृष्य दिसले. आंदोलनाच्या ठिकाणी एका वयोवृद्ध शेतकऱ्याला राकेश टिकैत यांनी त्यांच्या खांद्यावर मारले होते. टिकैत यांनी सांगितले की, वृद्ध शेतकऱ्यांनी त्यांच्या गावातूनच आम्हाला समर्थन द्यावे. या आजोबांना आम्ही त्यांच्या गावी सोडलेले, मात्र ते पुन्हा आंदोलनात भाग घेण्यासाठी आले आहेत. उद्याचा चक्का जाम हा केवळ गावांमध्ये होणार आहे. दिल्लीमध्ये य़ाचा काहीच फरक दिसणार नाही. आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुर आहे. याद्वारे पुढे सरकारशी चर्चा केली जाईल. इथे गेल्या 70 दिवसांपासून शेतकरी आंदोलक बसले आहेत. चर्चा देखील झडत आहेत. इथे बसणारे सर्वच चुकीचे आहेत का, असा सवालही टिकैत यांनी विचारला आहे. 

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलेल्या आरोपांवर टिकैत यांनी समाचार घेतला. सरकारकडून कोणत्या नेत्यावर लावलेल्या आरोपांवर कमतरता राहिलीय का? आज शेतकरी निम्म्या किंमतीत त्यांचे उत्पादन विकतात, हेच चुकीचे आहे का, असे ते म्हणाले. 

शुक्रवारी राज्यसभेमध्ये कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी काँग्रेस रक्ताची शेती करत असल्याचा आरोप केला होता. यावर टिकैत यांनी विरोधकांचे तर तेच सांगू शकतात, मी राज्यसभेतील चर्चा पाहिली नाही. शेतकरी शनिवारी दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत दिल्लीसोडून देशभरात चक्का जाम आंदोलन करणार आहेत. 

'रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते, भाजपा नाही', केंद्रीय कृषीमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल

तोमर काय म्हणाले...

नव्या कृषी कायद्यांना विरोध फक्त एका राज्यापुरता मर्यादित आहे. शेतकऱ्यांना भडकवले जात आहे. शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाबाबत कांग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संपूर्ण जगाला माहिती आहे की, पाण्यानेच शेती होते. रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते. भाजपा रक्ताने शेती करू शकत नाही, असे सांगत नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

टॅग्स :rakesh tikaitराकेश टिकैतFarmers Protestशेतकरी आंदोलनdelhiदिल्लीNarendra Singh Tomarनरेंद्र सिंह तोमरcongressकाँग्रेस