शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Old Pension Scheme: जुन्या पेन्शन योजनेवर मोठे अपडेट; अर्थ राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 17:36 IST

Old Pension Scheme: असदुद्दीन ओवेसी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भागवत कराड यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

Old Pension Scheme: तुम्ही स्वतः सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. राज्यांनी 'जुनी पेन्शन योजना' (Old Pension Scheme) लागू करण्याच्या निर्णयावर सोमवारी लोकसभेत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. 

ओवेसींचा प्रश्न...

असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्या प्रश्नावर अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी सोमवारी लेखी उत्तर दिले. त्यांच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्र्यांनी 'जुनी पेन्शन योजना' लागू करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले की, सरकारचा जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा कोणताही विचार नाही.

सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सरकार विचार करत आहे का? असा प्रश्न असदुद्दीन ओवेसी यांनी केला. त्यावर भागवत कराड म्हणाले की, जुनी पेन्शन (OPS) लागू करण्यासाठी अनेक राज्यांनी त्यांच्या स्तरावर अधिसूचना जारी केल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकारला हे स्पष्ट करायचे आहे की, एनपीएसचे पैसे परत करण्याची कोणतीही तरतूद नाही. छत्तीसगड, झारखंड, राजस्थान आणि पंजाब सरकारने राज्य कर्मचार्‍यांसाठी जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली असताना अर्थ राज्यमंत्र्यांचे हे उत्तर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

पंजाब सरकारने नोव्हेंबरमध्ये अधिसूचना जारी केलीभागवत कराड सरकारची भूमिका स्पष्ट करताना म्हणाले की राजस्थान, झारखंड आणि छत्तीसगडच्या सरकारने या संदर्भात केंद्र सरकार/पीएफआरडीएला त्यांच्या निर्णयाची माहिती दिली आहे. पंजाब सरकारने 18 नोव्हेंबर रोजी जुनी पेन्शन योजना 2022 पर्यंत सुरू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली होती. 

एनपीएसचे पैसे परत करण्यासाठी राजस्थान, झारखंड आणि छत्तीसगडच्या सरकारांनी प्रस्ताव पाठवला आहे. पण पंजाब सरकारकडून असे कोणतेही पत्र आलेले नाही. राजस्थान, झारखंड आणि छत्तीसगडच्या सरकारांना कळवण्यात आले आहे की एनपीएसचे पैसे परत करण्याची कोणतीही तरतूद नाही.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतlok sabhaलोकसभाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी