शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ओके हा निरर्थक शब्द, कर्मचारी भरतीतील प्रश्नाचा वाद कोर्टात; अपशब्द ‘अर्थपूर्ण इंग्रजी’ नाही : दिल्ली उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 13:33 IST

कर्मचारी निवड आयोगाने भारत सरकारमधील विविध नागरी पदांवर भरतीसाठी एकत्रित परीक्षा घेतली होती. या परीक्षेत इंग्रजी ओ, ई, के आणि वाय या अक्षरांतून किती अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतात, असा एक प्रश्न ३ मार्कांसाठी हाेता. उत्तरासाठी १, २, ३ आणि ४ असे पर्याय होते...

डॉ. खुशालचंद बाहेतीनवी दिल्ली : ओके हा अर्थ नसलेला शब्द आहे. अनौपचारिक वापरातील शब्द किंवा  अपशब्दांना अर्थपूर्ण भाषा म्हणता येणार नाही, असे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. 

कर्मचारी निवड आयोगाने भारत सरकारमधील विविध नागरी पदांवर भरतीसाठी एकत्रित परीक्षा घेतली होती. या परीक्षेत इंग्रजी ओ, ई, के आणि वाय या अक्षरांतून किती अर्थपूर्ण शब्द तयार होऊ शकतात, असा एक प्रश्न ३ मार्कांसाठी हाेता. उत्तरासाठी १, २, ३ आणि ४ असे पर्याय होते. शुभम पाल या उमेदवाराने ‘एक’ म्हणून उत्तर चिन्हांकित केले. निवड आयोगाने  जाहीर केलेल्या उत्तरामध्ये याचे उत्तर ‘दोन’ होते. शुभम आणि इतर काही उमेदवारांनी परीक्षेतील आयोगाच्या अशा एकूण ७ उत्तरांच्या अचूकतेला हायकोर्टात आव्हान दिले.  दिल्ली हायकोर्टाने आयोगाची ६ उत्तरे मान्य केली. परंतु, ‘ओ ई के वाय’ या प्रश्नाबद्दल याचिकाकर्त्याचे उत्तर बरोबर ठरवले. 

आयोगाने ‘ओके’बद्दल २ हेच उत्तर बरोबर असल्याचा दावा करीत भाषातज्ज्ञांच्या मतामध्ये उच्च न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, अशी भूमिका घेत या निर्णयास आव्हान दिले. तर, खंडपीठाने चुकीचे उत्तर न देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण न देणे अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त केले. ओके हा केवळ अनौपचारिक वापरातील शब्द असून, याला कोणताही अर्थ नसल्याचे निरीक्षण न्या. सी. हरीशंकर आणि न्या. सुधीरकुमार जैन यांनी नोंदवले. 

ओके ते ओके...कर्मचारी निवड आयोगाचे म्हणणे होते O E K Y पासून ‘YOKE’ आणि ‘OKEY’ हे २ शब्द बनतात. उमेदवारांनी युक्तिवाद केला की, या अक्षरांपासून ‘YOKE’ हा एकच ‘अर्थपूर्ण’ शब्द बनतो.

 

टॅग्स :Courtन्यायालयdelhiदिल्लीexamपरीक्षा