शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

तिकडे तेलवाहिनी फुटली; इकडे रेल्वेवाहतूक थांबली, उरण-नेरुळ ट्रेनला फटका, द्रोणागिरी यार्डमधील वाहतूक बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:34 IST

Uran-Nerul Railway: उरण - उरण-धुतुम येथील खासगी इंडियन ऑइल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीची अत्यंत ज्वलनशील नाफ्ता, पेट्रोलजन्य पदार्थ वाहून नेणारी पाइपलाइन बुधवारी (ता. १२) सकाळी फुटली.

- मधुकर ठाकूर उरण - उरण-धुतुम येथील खासगी इंडियन ऑइल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीची अत्यंत ज्वलनशील नाफ्ता, पेट्रोलजन्य पदार्थ वाहून नेणारी पाइपलाइन बुधवारी (ता. १२) सकाळी फुटली. हे ज्वलनशील द्रव्य न्हावा-शेवा स्थानकाजवळील रेल्वे रुळालगतचा तलाव, डबक्यात जमा झाल्याने प्रवासी वाहतुकीलाही धोका निर्माण झाला आहे. यामुळे खबरदारी म्हणून सकाळपासूनच उरण-खारकोपर मार्गावरील रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली. तर द्रोणागिरी-धुतुमदरम्यानची कंटेनर वाहतूक बंद करून अन्य मार्गाने वळविण्यात आली.

तेलगळतीच्या उग्र दर्पाने नागरिकांना मळमळणे, डोळे चुरचुरणे, गुदमरणे अशी लक्षणे जाणवू लागली. यामुळे सकाळी ११:४० पासून उरण-नेरूळ मार्गावरील रेल्वे प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी दिली. घटनेनंतर तातडीने द्रोणागिरी कंटेनर यार्ड परिसरातील कंटेनर वाहतूक  इतर मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती वाहतूक नियंत्रण उरण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल दहिफळे यांनी दिली. 

पाच तासांनंतर पूर्ववतइंडियन ऑइल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीच्या तेल वाहिन्यांच्या दुरुस्तीच्या कामात काही त्रुटी राहून गेल्याने तेल गळतीसारखी गंभीर परिस्थिती यापूर्वीही जुलै २०२४ मध्ये  निर्माण झाली होती. एप्रिल २०२५ मध्ये अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीच्या नवघर टर्मिनलमधील टॅक नं-२२ मध्ये आग लागून स्फोट झाला होता. यामध्ये रोहित सरगर हा अभियंता गंभीररीत्या जखमी झाला होता. मंगळवारी सकाळी ११:४० पासून बंद पडलेली रेल्वे प्रवासी वाहतूक संध्याकाळी पाचनंतर पूर्ववत झाली. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

तेल वाहिन्यांची दुरुस्ती आणि पसरलेले पेट्रोलजन्य पदार्थ सक्शन पंप लावून जमा करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती इंडियन ऑइल अदानी वेंचर्स लिमिटेड कंपनीचे एचआर संदीप काळे यांनी दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तेलवाहिनी फुटल्यानंतर तातडीने दोन्ही बाजूंनी ज्वलनशील पदार्थ वाहून नेणारे व्हॉल्व बंद केले. तसेच, कंपनीने जमा झालेल्या नाफ्था, पेट्रोलजन्य पदार्थावर फोमचा मारा केल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही.डॉ. उद्धव कदम, तहसीलदार, उरण 

English
हिंदी सारांश
Web Title : Oil pipeline burst halts Uran rail; Dronagiri yard operations affected.

Web Summary : An oil pipeline burst near Nhava-Sheva disrupted Uran-Nerul train services and Dronagiri yard container traffic. The leak caused citizen discomfort. Services resumed after five hours following repair work by Indian Oil Adani Ventures.
टॅग्स :Raigadरायगड