अंबाला - केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांवरून सध्या शेतकरी आणि केंद्र सरकार आमने-सामने आले आहेत. या कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून राजधानी दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनाही विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. केंद्रातील मोदी सरकारमधील मंत्री रतनलाल कटारिया यांनाही आज हरयाणामधील अंबाला येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना कटारिया यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले. कटारिया यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवले. त्यामुळे संतापलेल्या कटारिया यांनी शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केले.आंदोलन करायचेच होते तर कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन मरायचे होते, असे विधान कटारिया यांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना उद्देशून केले. माझे आंबाला येथे सात ते आठ कार्यक्रम आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना विरोधच करायचा होता तर कुठेतरी दुसऱ्या जागी जाऊन मरायचे होते. मला काळे झेंडे दाखवणाऱ्यांना देवाने सदबुद्धी द्यावी एवढीच प्रार्थना, असे कटारिया म्हणाले.
काळे झेंडे दाखवायचे होते तर दुसरीकडे जाऊन मरायचं होतं, मोदी सरकारमधील मंत्र्याचे शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान
By बाळकृष्ण परब | Updated: December 1, 2020 18:02 IST
Farmer Protest News : शेतकऱ्यांकडून राजधानी दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनाही विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे.
काळे झेंडे दाखवायचे होते तर दुसरीकडे जाऊन मरायचं होतं, मोदी सरकारमधील मंत्र्याचे शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान
ठळक मुद्देमोदी सरकारमधील मंत्री रतनलाल कटारिया यांनी शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान केलेआंदोलन करायचेच होते तर कुठल्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन मरायचे होते, असे विधान कटारिया यांना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना उद्देशून केलेअंबाला येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना कटारिया यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरे जावे लागले