शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशाचा दशरथ मांझी ! मुलांना शाळेत जाण्यासाठी डोंगर पोखरून बनवला रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2018 10:35 IST

सिनेमाच्या माध्यमातून बिहारचे दशरथ मांझी तर सर्वांना माहितीये.  त्यांनी एकट्याने तब्बल 360 फूट लांब ,30 फूट रूंद आणि 25 फूट उंचीचा डोंगर पोखरून एक रस्ता बनवला होता. ‘माऊंटन मॅन’म्हणून त्यांची जगाला ओळख आहे. आता ओडिशाच्या जालंधर नायक नावाच्या एका व्यक्तीने असाच पराक्रम केला आहे. आपल्या मुलांना शाळेत जाता यावं यासाठी नायक यांनी 8 किलोमीटरचा रस्ता खोदला आहे. 

कंधमाल(ओडिशा) : सिनेमाच्या माध्यमातून बिहारचे दशरथ मांझी तर सर्वांना माहितीये.  त्यांनी एकट्याने तब्बल 360 फूट लांब ,30 फूट रूंद आणि 25 फूट उंचीचा डोंगर पोखरून एक रस्ता बनवला होता. ‘माऊंटन मॅन’म्हणून त्यांची जगाला ओळख आहे. आता ओडिशाच्या जालंधर नायक नावाच्या एका व्यक्तीने असाच पराक्रम केला आहे. आपल्या मुलांना शाळेत जाता यावं यासाठी नायक यांनी 8 किलोमीटरचा रस्ता खोदला आहे. 

ओडिशाच्या गुमसाही गाव येथील ही घटना आहे. कंधमालचे रहिवासी जालंधर नायक यांनी गुमसाही गावापासून फुलबानी शहराला जोडणारा एक विशाल डोंगर पोखरून 8 किलोमीटर लांब रस्ता बनवला आहे. आपल्या मुलांना शाळेत जाता यावं यासाठी जालंधर यांनी हा पराक्रम केल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे.  जालंधर नायक हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.

 रस्ता नसल्यानं आपल्या मुलाचं शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी ते गेल्या दोन वर्षांपासून डोंगर फोडून रस्ता तयार करत आहेत. गेल्या दोन वर्षांत त्यांनी 8 किलोमीटर रस्ता तयार केला असून  पुढील 3 वर्षांत त्यांना 7 किलोमीटर रस्ता तयार करायचा आहे. भाजी विक्री करून झाल्यानंतर दिवसातले आठ तास ते डोंगर फोडून त्यातून रस्ता तयार करण्याचं काम करतात. गावात शाळा, अंगणवाडी नाही. त्यासाठी शहरात आम्हाला डोंगर ओलांडून जावं लागतं. रूग्णालयही नसल्याने माझ्या गर्भवती पत्नीला मी स्वतः 3 मैल चालत घेऊन गेलो होतो, त्यामुळे मी रस्ता बनवण्याचं ठरवलं असं जालंधर म्हणाले.

 मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी गावकऱ्यांना संपूर्ण डोंगर ओलांडून जावा लागतो. गावात पक्का रस्ता नसल्यानं गावकऱ्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे.

टॅग्स :Odisha's 'Mountain Man'ओडिशाचा दशरथ मांझीJalandhar Nayakजालंधर नायक