शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'कोब्रा' चावल्यानंतर युवकाने सापाला मारून टाकलं, मग पिशवीत घेऊन थेट हॉस्पिटल गाठलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:45 IST

जेव्हा अजित कर्मकार उडाला येथील हॉस्पिटलमध्ये पोहचला तेव्हा त्याच्या शरीरात विष पसरण्याचे लक्षण दिसत होते.

एखादा साप समोर दिसला की भल्याभल्यांची भंबेरी उडते. त्यातच कोब्रासारख्या अतिविषारी सापाने चावल्यानंतर माणूस जिवंत राहण्याची शक्यता फारच कमी असते.  मात्र ओडिशाच्या मयूरभंज येथे घडलेल्या प्रकाराने सगळेच हैराण झाले आहेत. याठिकाणी कोब्रा सापाने  एका व्यक्तीला ३ ते ४ चावा घेतला परंतु त्याने न घाबरता त्या सापाला मारलं. त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीत मेलेला साप भरून त्याने थेट हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलमध्ये तातडीने त्या व्यक्तीला दाखल करून घेत उपचाराला सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नागपाल गावातील आहे. येथील अजित कर्मकार नावाचा व्यक्ती घराबाहेर पडला असता त्याला झुडुपात लपून बसलेल्या कोब्रा सापाने दंश दिला. अजित त्याच्या घराबाहेर उभा होता. तेव्हा अचानक कोब्रा सापाने त्याच्यावर हल्ला केला. या विषारी सापाने अजितला ३-४ वेळा सर्पदंश दिला. या हल्ल्यानंतर अजितनेही न घाबरता त्या सापाला मारून टाकले आणि त्यानंतर मेलेला साप प्लॅस्टिक पिशवीत घेऊन तो हॉस्पिटलला पोहचला.

जेव्हा अजित कर्मकार उडाला येथील हॉस्पिटलमध्ये पोहचला तेव्हा त्याच्या शरीरात विष पसरण्याचे लक्षण दिसत होते. सापाने चावा घेतलेल्या जागेवरून रक्त वाहत होते. डोळ्यात विष उतरत होते. अजितची अवस्था पाहून हॉस्पिटलमधील डॉक्टरांनीही तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले. तो त्याच्यासोबत मेलेला साप घेऊन आला होता. त्याच्या हातातील पिशवी उघडून पाहिली तेव्हा अनेकांना धक्का बसला. त्यांनी मृत साप ताब्यात घेत कर्मकारवर योग्य ते उपचार सुरू केले. 

दरम्यान, रुग्णाने त्याच्यासोबत मेलेला साप घेऊन आल्यानंतर त्याला कोब्रा सापाने चावल्याचं कळलं, त्यामुळे त्यासाठी लागणारे उपचार करणं सोपे गेले. तपासणीवेळी आम्हाला त्याच्या शरीरावर कोब्राच्या दाताच्या खूणा सापडल्या. शरीरात विष पसरत होते. मेलेला साप तो घेऊन आल्यानंतर आम्ही ते पाहिले आणि तातडीने योग्य विषविरोधी औषध त्याला दिले. हॉस्पिटलच्या उपचाराने त्याचा जीव वाचल्याचं डॉक्टर राजकुमार नायक यांनी सांगितले.

साप चावल्यानंतर काय करावे?

साप चावला की, काही जण घरगुती उपाय करतात. अंधश्रद्धेला बळी पडून साप चावलेल्या जागेवर मंत्रोच्चार करतात. ज्यात त्यांचा जीवही जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्व उपाय करण्यात वेळ न घालवता साप चावल्यावर त्वरित रुग्णालय गाठावे. कोब्रा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. याची लांबी १८ फूटापर्यंत असू शकते. हा साप आपल्या शरीराचा एक तृतीयांश भाग उंच करू शकतो. या सापाचे शास्त्रीय नाव 'ओफीफॅगस हॅना' आहे. याच्या दंशाने ७ मिलीलीटर विष शरीरात जाते. हा साप चावल्यानंतर काही मिनिटातच मृत्यू होण्याची शक्यता असते.  

टॅग्स :snakeसापhospitalहॉस्पिटल