शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहलगाममध्ये २६ पर्यटकांची हत्या करणारे ते तीन दहशतवादी मारले', अमित शाहांची लोकसभेत माहिती
2
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
3
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
4
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
5
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
6
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
7
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
8
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
9
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
10
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
11
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
12
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
13
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
14
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
15
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
16
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
17
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
18
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
19
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
20
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता

Odisha Train Accident: कोरोमंडल एक्सप्रेस सरळ जाण्याऐवजी लूप लाइनवर का गेली? समोर आली माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 18:41 IST

Coromandel Express Derail: रेल्वे विभागाने ट्रेन अपघातात ड्रायव्हरची चुकी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Coromandel Train Accident: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या ओडिशा रेल्वे अपघाताबाबत मोठा खुलासा झाला आहे. या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला असून, यामुळे रेल्वे अपघाताचे कारण लवकर समोर येईल. मीडिया रिपोर्टनुसार, लूप लाईनवर इंटरलॉकिंग सिस्टीम बसवण्यात आली, ज्यामुळे हिरवा सिग्नल दिसला आणि ट्रेन तशीच पुढे धावली.

रिपोर्टनुसार, कोरोमंडल एक्स्प्रेस सरळ जाणार होती, पण लूप लाईनवर इंटरलॉकिंग सिस्टीम असल्याने ही ट्रेन याय मार्गावर सरळ निघाली. या अहवालात गाड्यांच्या हालचालीसह संपूर्ण तपशील देण्यात आला आहे. इंटरलॉकिंग सिस्टीम आणि सिग्नल्स बद्दल देखील माहिती या रिपोर्टमध्ये आहे.

इंटरलॉकिंग सिस्टीम कशी बिघडली?

सिग्नल हिरवा असूनही जर इंटरलॉकिंग सिस्टीम सिग्नलच्या अनुषंगाने नसून दुसऱ्या दिशेने असेल, तर याचा अर्थ येथे इंटरलॉकिंग सिस्टीम तुटलेली आहे. ही चूक कशी झाली? ही चूक काही तांत्रिक बिघाडामुळे झाली की, मानवी चूक होती की, षड्यंत्र होते? असे अनेक प्रश्न आहेत.

रेल्वेने काय म्हटले?सिग्नलिंग यंत्रणेत ही चूक शक्य नसल्याचे रेल्वेचे मत आहे. सिग्नल वेगळे आणि इंटरलॉकिंग वेगळे असे याआधी कधीच दिसले नाही. ही यंत्रणा अतिशय मजबूत आहे. या अपघातानंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग आणि पॉइंट मशीनमध्ये केलेल्या बदलांमुळे हा अपघात झाल्याचे सांगितले होते.

एक्सप्रेस लूप लाइनमध्ये कशी गेली?कोरोमंडल एक्स्प्रेसला मेन लाईनसाठी सिग्नल देण्यात आला होता, मात्र ही ट्रेन लूप लाईनवरच पुढे गेली आणि लूप लाईनवर उभ्या असलेल्या मालगाडीला धडकल्याने रुळावरून घसरली. यादरम्यान, बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस डाऊन मेन लाइनवरून जात असताना कोरोमंडलचे डबे त्यावर आदळले.

अपघातात 278 जणांचा मृत्यू ओडिशातील बालासोर जिल्ह्यात शुक्रवारी (2 जून) झालेल्या या अपघातात आतापर्यंत 278 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे बोर्डाने या अपघाताची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेOdisha Coromandel Express Accidentओडिशा कोरोमंडल एक्सप्रेस अपघातCBIगुन्हा अन्वेषण विभाग