शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांचा पोलिसाच्या गोळीबारात मृत्यू, विमानाने भुवनेश्वरला हलविले, पण वाचू शकले नाहीत प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 08:03 IST

Odisha Health Minister Death: ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नब किशोर दास यांच्यावर रविवारी ओडिशाच्या झारसुगुडा येथील ब्रजराजनगरमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपालकृष्ण दास (एएसआय) याने गोळ्या झाडल्या.

- अंबिका प्रसाद कानुनगोभुवनेश्वर : ओडिशाचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नब किशोर दास यांच्यावर रविवारी ओडिशाच्या झारसुगुडा येथील ब्रजराजनगरमध्ये सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपालकृष्ण दास (एएसआय) याने गोळ्या झाडल्या. मंत्री दास यांना प्रथम जिल्हा रुग्णालयात आणि नंतर विमानाने भुवनेश्वरला हलविण्यात आले. परंतु अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना रात्री त्यांचा मृत्यू झाला. गोळीबार करणाऱ्या उपनिरीक्षकास पकडले आहे. डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. एकच गोळी शरीरात घुसली होती. आरोपी दास बायपोलर डिस्ऑर्डरने ग्रस्त आहे. त्याला सहज राग यायचा आणि त्यासाठी त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याने माझी शेवटची भेट घेऊन एक वर्ष झाले आहे, असे एमकेसीजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे डॉ. चंद्रशेखर त्रिपाठी यांनी पत्रकारांना सांगितले.

नेमके काय झाले...ब्रजराजनगरमधील गांधी चौकाजवळ ही घटना घडली. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ते कारमधून उतरले असताना त्यांचे समर्थक त्यांना पुष्पहार घालत होते. याचवेळी हा गोळीबार झाला. या घटनेनंतर मंत्री लगेचच कोसळले. एक स्थानिक तरुण आणि एक पोलिस अधिकारीही गोळीबारात जखमी झाला. 

दास शनी शिंगणापूरला द्यायचे देणगीअहमदनगर : ओडिशाचे आरोग्यमंत्री नब दास यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शनी शिंगणापूरवर शोककळा पसरली. नब दास हे नेहमीच शनी शिंगणापूरला यायचे. ते मोठी देणगीही देवस्थानला द्यायचे. मात्र, ही देणगी आपण धार्मिक भावतेून देत आहोत. त्यामुळे त्याची कुठेच प्रसिद्धी करू नका, असे ते देवस्थानला सांगायचे. गत महिन्यात २१ जानेवारीला शनी अमावास्येच्या (पौष अमावास्या) दिवशी त्यांनी सहकुटुंब शनिदर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवस्थानला मोठी देणगी दिली होती. मात्र, याही वेळी त्यांनी देणगी दिल्याची प्रसिद्धी करू नका, असे त्यांनी सांगितले होते. शनी अमावास्येच्या दिवशीचे त्यांचे हे शनिदर्शन अखेरचे ठरले.

या घटनेने मला धक्का बसला आहे. या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. - नवीन पटनायक, मुख्यमंत्री, ओडिशा

महाविद्यालयीन जीवनापासून राजकारणातकायद्याचे पदवीधर असलेले नब किशोर दास (वय ६०) महाविद्यालयीन काळापासून राजकारणात होते. पश्चिम ओडिशातील सर्वांत जुन्या महाविद्यालयांपैकी एक असलेल्या संबलपूर येथील गंगाधर मेहेर महाविद्यालयात विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष राहिले होते. ओडिशात एनएसयूआयचे आणि यूथ काँग्रेसचे ते नंतर उपाध्यक्ष बनले. पटनायक यांच्या मंत्रिमंडळातील ते सर्वांत श्रीमंत सदस्यांपैकी एक होते. कोरोना काळात त्यांनी कौतुकास्पद काम केले होते. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे जवळचे विश्वासू मानले जाणारे दास यांनी २९ मे २०१९ रोजी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून शपथ घेतली. दास यांच्या पश्चात पत्नी मिनाती दास आणि मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

टॅग्स :Odishaओदिशा