शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ओडिशामध्ये जवानांनी 5 नक्षलवाद्यांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 10:58 IST

ओडिशातील मलकानगिरीतील कालीमेडा येथे सुरक्षा रक्षक आणि नक्षलवाद्यांमध्ये सोमवारी सकाळी चकमक झाली. यामध्ये पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. 

भुवनेश्वर - ओडिशामध्ये नक्षलवाद्यांविरोधात चालवल्या जाणाऱ्या मोहीमेत सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे. नक्षलग्रस्त भाग असलेल्या मलकानगिरी जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी मलकानगिरी जिल्ह्यातील कालीमेडा परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. यादरम्यान, पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळावरुन जवानांनी 5 हत्यारं आणि एक हँड ग्रेनेड जप्त केले आहे. दरम्यान, परिसरात अजूनही चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांचा नेता रणदेबचाही खात्मा झाल्याचे म्हटले जात आहे.

दंतेवाडामध्येही झाली होती चकमक गेल्या आठवड्यात दंतेवाडामध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले होते. दंतेवाडातील अरनपूर पोलीस ठाणे क्षेत्रात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. तर काही दिवसांपूर्वी  बीजापूरमध्ये झालेल्या नक्षली हल्ल्यात चार जवान शहीद झाले होते. 

(म्हणे आम्हाला त्या हत्येचं दु:ख; नक्षलवाद्यांनी जारी केलं पत्र)

 

दूरदर्शनच्या कॅमेरामनची हत्याछत्तीसगढच्या जंगलात दूरदर्शनचे कॅमेरामन अच्युतानंद साहू यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली. यानंतर नक्षलवाद्यांनी पत्र जारी केले. साहू वा पत्रकारांशी आपले अजिबात वैर नसून, सुरक्षा दलाच्या जवानांसह ते आले, तर ते मारले जाऊ शकतील, असा इशारा नक्षलवाद्यांनी शुक्रवारी दिला. नक्षलवाद्यांनी एक पत्र प्रसिद्धीस दिले असून, त्यात आमचे पत्रकारांशी काहीच वैर नाही, असे स्पष्ट केले. सुरक्षा दलाच्या जवानांसह कॅमेऱ्यासह आलेले लोक हे पत्रकारांच्या तुकडीचा भाग आहेत, हे आम्हाला माहीत नव्हते. ते सुरक्षा दलाचाच भाग असल्याचे वाटल्यामुळेच त्यांची हत्या झाली, असे त्यात म्हटले आहे. अच्युतानंद साहू ज्या ठिकाणी बसले होते, ते पाहून आम्हाला ते पत्रकार आहेत, हे समजले नाही. ते जवानच आहेत, असे आम्हाला वाटले. त्यामुळे त्यांची हत्या झाली असे नमूद करतानाच, त्यांच्या मृत्यूबद्दल नक्षलवाद्यांनी दु:खही व्यक्त केले आहे. तसेच यापुढे पत्रकारांनी वा त्यांच्या तुकडीने सुरक्षा दलाच्या जवानांसह येऊ नये, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे. तुम्ही एकटे आलात, तर तुमचे इथे स्वागतच केले जाईल, असे त्यांनी म्हटले. 

टॅग्स :naxaliteनक्षलवादीOdishaओदिशा