शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लढाई कोरोनाशी! आईच्या मृत्यूनंतरही 'हा' डॉक्टर मुलगा पोहोचला रुग्णांच्या सेवेवर, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 19:40 IST

17 मार्चला संबलपूर येथील सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक दास यांच्या 80 वर्षीय आई पद्मिनी दास यांचे निधन झाले. मात्र अशा, परिस्थितीतही अशोक दास हे सेवेवर उपस्थित होते. ते जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

ठळक मुद्दे17 मार्चला झाले होते डॉ. अशोक दास यांच्या आईचे निधनअशोक दास यांच्या आई 80 वर्षांच्या होत्यायापूर्वीही एस आयएएस अधिकारी वडिलांच्या मृत्यूनंतर 24 तासांत झाले होते कामावर रुजू 

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. राज्ये लॉकडाउन झाली आहेत. रेल्वे पाठोपाठ आता अंतर्गत विमानसेवाही बंद होणार आहेत. लोकांना घरूनच काम करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, असे असतानाच डॉक्टर, पोलीस आणि सफाई कामगार सर्वसामान्यांच्या सेवेसाठी घराबाहेर आहेत. यातच ओडिशातील एक डॉक्टर त्यांच्या आईचे निधन झालेले असतानाही, त्याच दिवशी पूर्ण वेळ रुग्णालयात सेवेवर उपस्थित होते, असे वृत्त आहे. 

‘इंडिया टाइम्स‘ने दिलेल्या एका वृत्तानुसार, 17 मार्चला संबलपूर येथील सहायक विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक दास यांच्या 80 वर्षीय आई पद्मिनी दास यांचे निधन झाले. मात्र अशा, परिस्थितीतही अशोक दास हे सेवेवर उपस्थित होते. ते जिल्ह्याचे नोडल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

याच दिवशी डॉ. अशोक यांनी अनेक बैठकांत भाग घेतला. लोकांमध्ये जाऊन त्यांना कोरोनाचा सामना कसा करावा, यासंदर्भात माहिती दिली. एवढेच नाही, तर ते जिल्ह्याच्या मुख्य रुग्णालातही गेले. तेथील परिस्थितीचीही त्यांनी पाहणी केली. यानंतर सायंकाळचे सर्व काम  संपवून ते घरी गेले आणि आईवर अंत्यसंस्कार केले. यावर बोलताना डॉ. अशोक म्हणाले, या क्षणी सुट्टीपेक्षाही सेवा म्हत्वाची आहे आणि मीही तेच केले.

एका आयएएस अधिकाऱ्याचे असेच वृत्त समोर आले होते -यापूर्वी ओडिशातीलच एक आयएएस अधिकारी निकुंज धल यांचेही असेच उदाहरण समोर आले होते. त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. यानंतर ते केवळ 24 तासांतच आपल्या कामावर रुजू झाले होते. त्यांच्याकडे राज्याचे मुख्य सचिव आरोग्य व कुटुंब कल्याणची जबाबदारी देण्यात आलेली आहे. कोरोनाबरोबरच्या या लढ्यात निकुंज आणि अशोक यांच्यासारख्या अधिकाऱ्यांचे करावे तेवढे कौतूक कमीच आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOdishaओदिशाdoctorडॉक्टरcollectorजिल्हाधिकारीIndiaभारत