शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसींची ‘क्रीमी लेयर’ मर्यादा आठ लाख, जातींच्या पोटवर्गीकरणासाठी आयोग, केंद्र सरकारचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 05:48 IST

ओबीसींनी केंद्रीय नोक-यांमधील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी असलेली ‘क्रीमी लेयर’ची उत्पन्न मर्यादा केंद्र सरकारने सहा लाखांवरून आठ लाख रुपये केली आहे.

नवी दिल्ली : ओबीसींनी केंद्रीय नोक-यांमधील आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी असलेली ‘क्रीमी लेयर’ची उत्पन्न मर्यादा केंद्र सरकारने सहा लाखांवरून आठ लाख रुपये केली आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, यामुळे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपर्यंत असलेल्या ओबीसींना फायदा होईल.‘क्रीमी लेयर’ची ही वाढीव उत्पन्नमर्यादा सार्वजनिक उपक्रमांतील नोकºयांनाही लागू करण्याचा विचार आहे, असेही जेटली म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, ओबीसींना सरसकट आरक्षण न देता ठरावीक उत्पन्न मर्यादेच्या आतील व्यक्तींनाच आरक्षण देणे, १९९० च्या दशकात सुरू झाले, तेव्हा ‘क्रीमी लेयर’ची मर्यादा वार्षिक दोन लाख रुपये होती. कालांतराने महागाई लक्षात घेऊन, ती वेळोवेळी वाढविण्यात आली.नवा आयोगओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे, परंतु त्यांच्यातील पुढारलेल्या जातींनाच आरक्षणाचा मोठा वाटा मिळतो व तुलनेने मागासलेल्या जाती वंचित राहतात. हे टाळण्यासाठी आरक्षण ओबीसींमधील विविध जातींना वाटून देता यावे, यासाठी जातींचे पोटवर्गीकरण करण्याचा प्रस्ताव अनेक वर्षे विचाराधीन होता. हे पोटवर्गीकरण करण्यासाठी स्वतंत्र आयोग नेमण्यासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.अध्यक्षांची नेमणूक झाल्यापासून तीन महिन्यांत आयोगाने अहवाल द्यायचाआहे. ओबीसींच्या आरक्षणाचे लाभ सध्या विविध जातींना कसे विषमतेने मिळतात, याचा अभ्यास करणे व हे लाभ ओबीसींमधील सर्व जातींना नीट मिळावेत, यासाठी निकष व प्रक्रिया सुचविणे हे काम आयोगाने करायचे आहे.सुप्रीम कोर्टाकडून मुभासर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर १९९२ मध्ये इंदिरा सहानी वि. भारत सरकारया प्रकरणात दिलेल्या निकालात, मागास जातींचेही मागास व अतिमागास असे पोटवर्गीकरण करण्यास राज्यघटना किंवा कायद्याने मज्जाव नाही, असे नमूद केले. त्यामुळे पोटवर्गीकरणे बेकायदा ठरणार नाही. महाराष्ट्रासह देशातील नऊ राज्यांनी असे पोटवर्गीकरण या आधीच केले आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय