शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

OBC Bill: लोकसभेनंतर राज्यसभेतही ओबीसी विधेयक संमत; विरोधकांची पूर्ण साथ, राष्ट्रपतींकडे पाठविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 19:39 IST

Rajya Sabha passes OBC bill घटनादुरुस्ती विधेयकाचा मसुदा सरकारने दोन दिवसांपूर्वीच सदस्यांना वितरित केला होता. या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारांना त्यांची स्वतंत्र ओबीसींची यादी बनविण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त होणार आहे.

कोणत्याही जातीला वा जाती समूहांना मागास ठरविण्याचे अधिकार राज्यांना देण्यासाठीचे १२७ वे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही बहुमताने मंजूर झाले. या विधेयकाला सत्ताधारी पक्षांमधील सदस्यांसह विरोधकांनीही पूर्णपणे समर्थन दिले. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे सहीसाठी जाणार आहे. (Rajya Sabha passes the Constitution (One Hundred and Twenty Seventh Amendment) Bill 2021 which proposes to restore the power of states & UTs to make their own OBC lists)

या घटनादुरुस्ती विधेयकाचा मसुदा सरकारने दोन दिवसांपूर्वीच सदस्यांना वितरित केला होता. या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारांना त्यांची स्वतंत्र ओबीसींची यादी बनविण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त होणार आहे. सामाजिक न्यायमंत्री वीरेंद्र कुमार यांनी हे विधेयक लोकसभेत मांडले होते. या विधेयकानुसार राज्यांना, केंद्र शासित प्रदेशांना आता ओबीसी यादी बनविता येणार आहे. राज्यसभेत हे विधेयक 187 मतांनी संमत करण्यात आले. लोकसभेत हे विधेयक 10 ऑगस्टला संमत झाले होते. 

सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात केली. हे विधेयक राज्यांना ओबीसी यादी तयार करण्याचे अधिकार देते. जर राज्याची यादी थांबविली गेली तर जवळपास 631 जातींना शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा लाभ मिळू शकला नसता. दुसरीकडे काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा देताना सरकारने आपली चूक सुधारल्याचे म्हटले आहे. मात्र, आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटविण्याबाबत या विधेयकामध्ये काहीही म्हटलेले नाही, असा आरोप अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. 

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीRajya Sabhaराज्यसभा