शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
2
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
3
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
4
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
5
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
6
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
7
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
8
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
9
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
10
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
11
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
12
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
13
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
14
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
15
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
16
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
17
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
18
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
19
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
20
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 

'हिंदू-मुस्लिम वाद पेटवणाऱ्या नेत्यांना जाळून टाका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 17:24 IST

सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओ.पी.राजभर यांनी हिंदू-मुस्लिमसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजभर यांनी राजकीय नेत्यांवर दंगली भडकावण्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देनेत्यांवर जातीय दंगली भडकावण्याचा आरोपदंगलींमध्ये नेते का मरत नाहीत - ओ.पी.राजभर

लखनौ - सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष ओ.पी.राजभर यांनी हिंदू-मुस्लिमसंदर्भात केलेल्या विधानावरुन नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजभर यांनी राजकीय नेत्यांवर दंगली भडकावण्याचा आरोप केला आहे. शिवाय,''आजपर्यंत जातीय दंगलींमध्ये केवळ सामान्य जनतेचाच का बळी जातो?, राजकीय नेते का मरत नाही?'' असा प्रश्नही राजभर यांनी उपस्थित केला आहे. अलीगडमधील एका सभेत संबोधित करताना ओ.पी.राजभर यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. 

ओपी राजभर म्हणाले की, 'हिंदू-मुस्लिमांच्या घडलेल्या दंगलींमध्ये आजपर्यंत एकतरी मोठा नेता मारला गेला आहे का?, नेते का मरत नाहीत? जे नेते हिंदू-मुसलमानांच्या नावावर तुमच्यामध्ये भांडणं लावतात, दंगली घडवण्याचा प्रयत्न करतात, अशा नेत्यांनाही जाळून टाका. जेणेकरुन नेत्यांच्या सांगण्यावरुन आपण इतरांना जाळणार नाही, हे त्यांना चांगलंच समजेल. 

पुढे ते असंही म्हणाले की, हे नेते हिंदू-मुसलमानांमध्ये फूट पाडतात. दोन समाजांमध्ये फूट पाडणाऱ्यांनी जरा भारताच्या संविधानाचाही विचार करावा. कारण राज्यघटनेने भारताचा नागरिक असणाऱ्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे नेतेमंडळींना कोणालाही देशाबाहेर काढता येऊ शकत नाही’.

राजभर यांचा सुहेलदेव बहुजन समाज पक्ष हा उत्तर प्रदेश सरकारमध्ये भाजपाचा मित्रपक्ष आहे.  काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपाला एनडीएमधून बाहेर पडण्याची धमकी दिली होती.

लोकसभा निवडणूक एकत्रित लढवायची आहे की नाही याचा विचार करण्यासाठी राजभर यांनी भाजपाला 100 दिवसांचा कालावधी दिला आहे. भाजपाकडून वेळेत उत्तर आले नाही तर आमचा पक्ष सर्व 80 जागांवर निवडणूक लढवेल, असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.  

 

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीमyogi adityanathयोगी आदित्यनाथ