शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सुप्रीम काेर्ट ओलांडत आहे ‘लक्ष्मण रेषा’; माजी न्यायाधीशांची पत्राद्वारे टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 05:48 IST

उच्च न्यायालयातील १५ माजी न्यायाधीश, अखिल भारतीय सेवेतील ७७ माजी अधिकारी यांनी असा आरोप केला की, ही टिप्पणी दुर्दैवी आहे.

नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजपमधून निलंबित केलेल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या टिप्पणीवर माजी न्यायाधीश आणि अधिकारी वर्ग यांनी टीका केली आहे. न्यायालयाने या प्रकरणात लक्ष्मण रेषेचे उल्लंघन केले आहे. ही टिप्पणी म्हणजे सर्वात मोठ्या लोकशाहीच्या न्यायव्यवस्थेवरील हा अमिट डाग असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने ही टिप्पणी मागे घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

उच्च न्यायालयातील १५ माजी न्यायाधीश, अखिल भारतीय सेवेतील ७७ माजी अधिकारी यांनी असा आरोप केला की, ही टिप्पणी दुर्दैवी आहे. ती न्यायिक मूल्यांशी सुसंगत नाही. यामुळे देशातील आणि विदेशातील लोकांना धक्का बसला आहे. या समूहाने एका निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यात म्हटले की, न्यायपालिकेच्या इतिहासात अशी दुर्दैवी टिप्पणी पाहिली नाही. याप्रकरणी तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे. कारण, लोकशाही मूल्ये व देशाच्या सुरक्षेवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. 

निवेदनात काय?ही टिप्पणी न्यायिक आदेशाचा भाग नाही. जबाबदार नागरिक म्हणून आम्ही असे मानतो की, लोकशाही तोपर्यंतच अबाधित राहू शकते जोवर सर्व संस्था संविधानानुसार आपापले कर्तव्य पार पाडत राहतील. 

स्वाक्षरी करणाऱ्यात नेमके कोण?या निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश क्षितिज व्यास, केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. एन. रवींद्रन, गुजरात उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. एम. सोनी, राजस्थान उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एस. एन. ढिंगरा यांचा समावेश आहे. माजी आयएएस अधिकारी आनंद बोस, आर. एस. गोपालन आणि एस. कृष्ण कुमार, राजदूत (निवृत्त) निरंजन देसाई, माजी पोलीस महासंचालक एस. पी. वैद आणि बी. एल, व्होरा, ले. जनरल (निवृत्त) व्ही. के. चतुर्वेदी आणि एअर मार्शल (निवृत्त) एस. पी. सिंह यांनीही स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

सुप्रीम कोर्टाने काय म्हटले होते?न्यायालयाने नुपूर शर्मा यांना वक्तव्याप्रकरणी फटकारले होते. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याने पूर्ण देशाला आगीत लोटले आहे व देशात जे काही होत आहे त्यासाठी त्या एकट्या जबाबदार आहेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय