शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

देशात दिवसभरात वाढले ८३८० रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 4:50 AM

आतापर्यंत ५,१६४ जणांचा मृत्यू : आरोग्य मंत्रालयाने दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चौथ्या टप्प्यातील लॉकडाउन संपवून देशात पाचव्या टप्प्यातील टाळेबंदीची घोषणा करण्यात आली असतानाच रविवारी केवळ एका दिवसात नव्या कोरोनाबाधितांची संख्या ८ हजार ३८० वाढली आहे, तर देशातील कोरोनामुळे एकूण दगावलेल्यांची संख्या ५ हजार १६४ इतकी झाली आहे. एकूण बाधितांचा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे.आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मााहितीनुसार, देशात सध्या कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १,८२,१४३ इतकी आहे. देशात महाराष्ट्र कोरोनामुळे सर्वाधिक बाधित ठरला आहे. इथे सध्या ६५,१६८ कोरोनाबाधित आहेत, तर ४३,८९0 जणांवर उपचार सुरू आहेत आणि 28,081 जण यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाने अद्याप एकूण २१९७ जणांचे बळीघेतले आहेत. दिल्लीत सध्या १८,५४९ कोरोनाबाधित आहेत, तर १०,०५८ जणांवर उपचार सुरू आहेत आणि ८,०७५ जण यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. दिल्लीत कोरोनाने अद्याप एकूण ४१६ जणांचे बळी घेतले आहेत.मध्य प्रदेशात सध्या ७८९१ कोरोनाबाधित आहेत, तर ३१०४ जणांवर उपचार सुरू आहेत आणि ४,४४४ जण यातून पूर्णपणे बरे झाले आहेत, तर कोरोनाने अद्याप एकूण ३४३ जणांचे बळी घेतले आहेत.कोरोना संसगार्मुळे गुजरातमधील स्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. गुजरातमध्ये सध्या १६,३४३ कोरोनाबाधित आहेत, तर एकूण १००७ जणांचे बळी गेले आहेत.तमिळनाडूमध्ये सध्या २१,१८४ कोरोनाबाधित आहेत, तर ९०२४ जणांवर उपचार सुरू आहेत आणि एकूण १६० जणांचे बळी घेतले आहेत. उत्तर प्रदेशात बाधितांची संख्या ७४४५ वर पोहोचली आहे, तर २०१ जणांचे बळी गेले आहेत.बिहारमध्ये आतापर्यंत ३६३६, चंदीगड २८९, छत्तीसगढ ४४७, गोवा ७०, हरयाणा १९२३ तर झारखंडमध्ये ५६३ कोरोनाबाधित आढळले आहेत. पूर्वेतील राज्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढलादेशात बाधित आणि बळींचा आकडा सातत्याने वाढत असताना समाधानाची बाब एकच आहे की, कोरोना रुग्णांची आकडेवारी दुप्पट होण्याचा कालावधी आधीपेक्षा वाढला असून, मृत्युदरही कमी झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या मााहितीनुसार, रूग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५.४ दिवसांवर आला आहे. हा कालावधी मागील दोन आठवड्यांत १३.३ दिवस इतका होता. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दरही कमी होऊन २.५५ टक्के इतका झाला आहे. मागील आठवड्यात हाच दर २.८६ टक्के इतका होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या