चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशाची आर्थिक राजधानी मुंबईत उष्ण रात्रींची संख्या सातत्याने वाढत चालली असल्याचा निष्कर्ष ऊर्जा, पर्यावरण आणि पाणी परिषदेने काढला आहे. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रासह १० राज्यांत उष्णतेचे प्रमाण तुलनेत जास्त असल्याचे आढळून आले आहे.
सीईईडब्ल्यू या संस्थेचा ‘हाऊ एक्स्ट्रीम हिट इज इम्पॅक्टिंग इंडिया’ या अहवालानुसार २०१२ ते २०२२ या दहा वर्षांत सर्वाधिक उष्ण रात्रींची संख्या मुंबईत वाढली आहे. मुंबईत दरवर्षी सरासरी १५ अतिरिक्त उष्ण रात्रींची नोंद करण्यात आली आहे.