शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

चिंताजनक... वर्षभरात काश्मीर खोऱ्यातील १२६ तरुण अतिरेकी मार्गाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 06:53 IST

गेल्या वर्षात काश्मीर खोऱ्यातील स्थानिक युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सन २०१७ मध्ये १२६ तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश घेतला.

जम्मू : गेल्या वर्षात काश्मीर खोऱ्यातील स्थानिक युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सन २०१७ मध्ये १२६ तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश घेतला.  ही संख्या २0१६ पेक्षा ८८ ने अधिक होती, अशी माहिती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. संसदेला सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे स्थानिक तरुणांचे प्रमाण २०१४ नंतर कमालीचे वाढले आहे. सन २०११ ते २०१३ या काळात भरतीचे प्रमाण कमी होताना दिसले होते. सन २०११ मध्ये २३ तरुण दहतवादी संघटनांत सहभागी झाले, तर हाच आकडा २०१२ मध्ये २१ आणि २०१३ मध्ये १६ इतका होता. मात्र, २०१४ मध्ये हा आकडा ५३ वर पोहोचला. पुढच्या तीन वर्षात हे आकडे अनुक्रमे ६६, ८८ व १२६ असे वाढत गेले. हिजबुल मुजाहिद्दिनचा म्होरक्या बुºहान वणी लष्करी कारवाईत मारला गेल्यानंतर तरुणांचे हत्यार हातात घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. नव्वदच्या दशकात दहशतवादाकडे ओढले जाणारे तरुण वआताचे यात आमुलाग्र फरक आहे, असे अधिकाºयांचे म्हणणे आहे. सध्या दहशतवादी संघटनांत भरती होणारे तरुण आधीच्या तुलनेत कमालीचे कट्टर आहेत. त्यांना कारवायांमध्ये मारले जाण्याची अजिबात फिकीर नसते. तुरुंगात २,६९४ कैदीमुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी असेही सांगितले की, राज्यात विविध तुरुंगांमध्ये २ हजार ६९४ लोक कैदेत आहेत. यात ९६ महिला आहेत. यातील आठ महिलांसह २८८ जणांवर दोष सिद्ध झाला आहे. अन्य २ हजार १५६ जणांवर खटले सुरु आहेत. >दगडफेकीत ११,५६६ जवान जखमी तीन वर्षांत काश्मीरमध्ये दगडफेकीत ११ हजार ५६६ सुरक्षा जवान जखमी झाले असून, ११० स्थानिक रहिवासी व दोन पोलिसांना जीव गमावले आहेत, अशीही माहिती मेहबुबा मुफ्ती यांनी दिली. या तीन वर्षांमध्ये दगडफेकीच्या ४७३६ घटना घडल्या. त्यात ९ हजार ६७० पोलीस कर्मचारी आणि १ हजार ८९६ सुरक्षा जवान जखमी झाले. ५१५ घुसखोरांना अटकनवी दिल्ली : लोकसभेत गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सांगितले की, २०१७ मध्ये जम्मू-काश्मिरात ५१५ घुसखोरांना अटक करण्यात आली आणि ७५ अतिरेकी कारवाईत ठार झाले. सन २०१६ मध्ये सीमेवर घुसखोरी करणाºया ४५ अतिरेक्यांना यमसदनी धाडण्यात आले.  सीमेवरुन होणारी घुसखोरी रोखण्यासाठी लष्कराने कडकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे, घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी गुप्तहेर यंत्रणा अद्ययावत करण्यात आली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद