शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानच्या रुग्णालयात मरण पावलेल्या अर्भकांची संख्या १०० वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2020 07:05 IST

विरोधकांची सरकारवर टीका; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे राज्य सरकारला पत्र

कोटा : येथील जे. के. लोन शासकीय रुग्णालयात डिसेंबरच्या अखेरच्या दोन दिवसांत आणखी नऊ अर्भकांचा मृत्यू झाला. त्यामुळे या महिन्यात तेथे मरण पावलेल्या अर्भकांची संख्या १०० झाली आहे. अर्भक मृत्यू प्रकरणात लक्ष घालण्याबद्दलचे पत्र केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना लिहिले आहे.याआधी या रुग्णालयात २३ व २४ डिसेंबर रोजी १० अर्भके मरण पावली होती. त्यासंदर्भात राजस्थान सरकारवर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये या रुग्णालयात मरण पावलेल्या अर्भकांची संख्या कमी आहे, अशी सारवासारव रुग्णालयाने केली होती. या रुग्णालयात २०१८ सालीही १००५ अर्भकांचा मृत्यू झाला होता. जन्मत:च अत्यंत कमी वजन व प्रतिकारशक्ती असलेल्या अर्भकांचाच मृत्यू ओढावल्याचेही जे. के. लोन रुग्णालयाच्या अधीक्षकांनी म्हटले होते.भाजपचे खासदार लॉकेट चॅटर्जी, कांता कर्दम, जसकौर मीना यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केल्यानंतर तेथील स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. उपचार सुरू असलेल्या दोन ते तीन अर्भकांना एकाच खाटेवर ठेवल्याचे त्यांना आढळून आले. या रुग्णालयात पुरेशा संख्येने परिचारिका नाहीत, असे त्यांना दिसले.अर्भकांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय बालहक्क रक्षण आयोगाने राजस्थान सरकारला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या रुग्णालयाच्या आवारात डुकरे फिरताना आढळून आली, असे आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी म्हटले आहे. जे. के. लोन रुग्णालयात अर्भकांवर योग्य उपचार करण्यात येत होते, असा दावा राजस्थान सरकारने केला होता. (वृत्तसंस्था)राजकीय भांडवल करू नका : अशोक गेहलोतराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे की, कोटाच्या रुग्णालयातील अर्भकांच्या मृत्यू प्रकरणाचे कोणीही राजकीय भांडवल करू नये.केंद्र सरकारकडून येणाऱ्या शिष्टमंडळाने जे. के. लोन शासकीय रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर तेथे आणखी कोणत्या वैद्यकीय सुविधा असाव्यात याविषयी शिफारशी कराव्यात. त्याची पूर्तता राजस्थान सरकारकडून केली जाईल, असेही ते म्हणाले. या प्रकरणाची माहिती काँग्रेसचे राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडेय यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना गुरुवारी दिली.