शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 14:39 IST

भारतात येणा-या विदेशी पर्यटकांसाठी केंद्र सरकारकडून ई-व्हिसाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ई-व्हिसाला विदेशी पर्यटकांकड़ून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भारतात येणा-या पर्टकांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

ठळक मुद्दे ई-व्हिसाला विदेशी पर्यटकांकड़ून चांगला प्रतिसादपर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ बांगलादेशचे पर्यटक जास्त

नवी दिल्ली, दि. 17 -  भारतात येणा-या  विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्क्यांनी वाढ झाल्याती माहिती केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने दिली आहे. भारतात येणा-या विदेशी पर्यटकांसाठी केंद्र सरकारकडून ई-व्हिसाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या ई-व्हिसाला विदेशी पर्यटकांकड़ून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने भारतात येणा-या पर्टकांमध्ये वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. पर्यटन मंत्रिमंडळाकडून यासंदर्भात एक निवेदन जारी करण्यात आले आहे. यामध्ये यावर्षी जानेवारी ते जुलै या महिन्यात भारतात आलेल्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत 15 टक्के वाढ झाली आहे, असे म्हटले आहे. विदेशी देशांपैकी भारतात येणारा पर्यटकांमध्ये बांगलादेशचे पर्यटक जास्त आहेत. त्यापाठोपाठ अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांचा समावेश आहे. गेल्या जुलै महिन्यात बांगलादेशातून 20.12 टक्के, अमेरिकेतून 16.26 टक्के, ब्रिटनमधून 10.88 टक्के आणि फ्रान्समधून 3.01 टक्के पर्यटक भारतात आले आहेत.  जानेवारी ते जुलै 2017 मध्ये 56.74 लाख पर्यटक भारतात आले. गेल्यावर्षीच्या तुलनेत यामध्ये 15 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत 49.30 लाख पर्यटक आल्याची नोंद पर्यटन मंत्रालयाकडे आहे. याचबरोबर, गेल्या जुलै महिन्यात 7.88 लाख विदेशी पर्यटक भारतात आले. तर गेल्यावर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत 7.4 टके वाढ झाली आहे.   विदेशी पर्यटकांना भारतात आकर्षित करण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ई-व्हिसा या सेवेमुळे सुद्धा पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ई-व्हिसावरुन 1.19 लाख विदेशी पर्यटक भारतात आले. तर, याच महिन्यात गेल्यावर्षी 2016 मध्ये 0.68 लाख विदेशी पर्यटक आले होते. त्यामध्ये यंदा यामध्ये जवळपास 73.3 टक्क्यांची वाढ झाली आहे.  ई-व्हिसा सेवेचा लाभ घेत भारतात आलेल्या विदेशी पर्यटकांपैकी अमेरिकेचे पर्यटक जास्त आहेत. यामध्ये अमेरिका (12 टक्के) यूएई (7.2 टक्के), फ्रान्स (6.4 टक्के) ओमन (6.1 टक्के) आणि चीन (5.4 टक्के) या देशांमधील पर्यटक गेल्या जुलै महिन्यात ई-व्हिसावरुन भारतात आहे.